जव्हारच्या रणरागिनींनी राम कदमच्या फोटोला मारले जोडे  

jode andolan
jode andolan

मोखाडा : भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या असभ्य विधानाचा  निषेध व्यक्त करत संतप्त झालेल्या शिवसेना महिला आघाडीसह जव्हारच्या शिवसैनिकांनी गांधीं चौक येथे राम कदमच्या फोटोला चपलांनी अक्षरशः बदडले आणि त्याच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला आहे.

महिला व मुलींबद्दल असभ्य, अश्लाघ्य व दर्जाहिन वक्तव्य करून समस्त समाजातील कौटुंबिक वातावरण बिघडवून आपली राजकीय दहशत निर्माण करणाऱ्या आमदार राम कदमचा उपस्थित शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रक्षोभकपणें आपला निषेध केला आहे. 

शिवसेना महिला आघाडी आयोजित उस्फूर्त आंदोलनात माजी नगराध्यक्षा तथा महिला आघाडी जव्हार तालुका समन्वयक कांचनमाला चुंबळे, तालुका संघटक संगीता जाधव, शहर संघटक शलाका आयरे, उपनगराध्यक्षा पद्मा रजपूत, नगरसेविका स्वाती सोनावणे, ज्येष्ठ कार्यकर्त्या मंगला माळगावीं भारती शिंदे, रश्मी वाघ, रेवती महाले यांच्यासह या "जोडे मारो" आंदोलनात विशेष उपस्थिती म्हणजे विद्यमान नगराध्यक्ष भिकूशेठ पटेल  उपजिल्हाप्रमुख प्रफुल्ल पवार, तालुकाप्रमुख श्रावण खरपडे, उपशहरप्रमुख हर्षद कोतवाल, नगरसेवक गणेश रजपूत,विक्रमगड विधानसभा मतदारसंघ महिला आघाडी संघटक सारिकाताई निकम मोखाडा तालुका संघटक बेबीताई बरफ, उपतालुका संघटक अनिता रोज, आजी-माजी शिवसेना पदाधिकारी, संपूर्ण युवासेना पदाधिकारी,  तसेच तमाम शिवसेना कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
 

हे "जोडे मारो आंदोलन" कार्यक्रम नवनियुक्त जव्हार शहरप्रमुख परेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. तथापी जोपर्यंत या आमदाराचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही अशी संतप्त भावना या आंदोलनात महिला आघाडीच्या रणरागिनींनी व्यक्त केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com