विविध कार्यक्रमांनी संयुक्त जयंती महोत्सवाची सांगता

रमेश मोरे
सोमवार, 14 मे 2018

पिंपळे गुरव येथील रहिवाशी 
रमेश गिरजुबा जाधव. वनपाल भांबुरडा पुणे,रजत पदक विजेते महाराष्ट्र शासन
यांचा जयंती उत्सव समितीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. अमरसिंग अदियाल, राजश्री जाधव, राहुल काकडे, चंद्रकांत गायकवाड यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक म्हस्के यांनी केले.तर आभार सुजाता निकाळजे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन राहुल वाघमारे, संदिप नितनवरे, गजानन कांबळे,सिद्धार्थ मराडे,विजय माघाडे,राजेंद्र डोनोलिकर आदींनी केले.

जुनी सांगवी : सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध कँम्प, सेहेचाळीस विविध सामाजिक संस्था,बुद्ध विहारे, महिला बचतगटाच्या वतीने आयोजित भगवान गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीन दिवसीय संयुक्त जयंती महोत्सवाची विविध कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली.

तिस-या दिवशी प्रविण कदम प्रस्तुत "मावळा मी शिवबाचा सैनिक मी भिमाचा, हा प्रबोधनात्मक गितांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.त्यांनी "माझ्या भिमाची पुण्याई. साऱ्या विश्वाला बुद्ध हवा..आहे कोणाचं योगदानं लाल दिव्याच्या गाडीला.. छाती ठोकु हे सांगु जगाला..आदी गाणी सादर केली. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात अत्त दिप महिला व मुलिंच्या संघाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यात कवि संमेलन घेण्यात आले.अनेक नवोदितांनी यावेळी कविता सादर केल्या.तर याच कार्यक्रमात सामाजिक कार्यात योगदान करणा-या मान्यवरांचा जयंती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पिंपळे गुरव येथील रहिवाशी 
रमेश गिरजुबा जाधव. वनपाल भांबुरडा पुणे,रजत पदक विजेते महाराष्ट्र शासन
यांचा जयंती उत्सव समितीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. अमरसिंग अदियाल, राजश्री जाधव, राहुल काकडे, चंद्रकांत गायकवाड यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक म्हस्के यांनी केले.तर आभार सुजाता निकाळजे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन राहुल वाघमारे, संदिप नितनवरे, गजानन कांबळे,सिद्धार्थ मराडे,विजय माघाडे,राजेंद्र डोनोलिकर आदींनी केले.

Web Title: jayanti programme in Sangvi