Pune Crime News : लाच स्वीकारणाऱ्या थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे अखेर निलंबित

जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे, की निलंबन कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता जेव्हा जेव्हा देण्यात येईल त्यावेळी खासगी नोकरी स्विकारली नाही किंवा खासगी धंदा व व्यापार करीत नाही, अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र जयश्री कवडे यांनी द्यायचे आहे.
jayshree kawade suspended over taking bribe collector order pune municipal corporation
jayshree kawade suspended over taking bribe collector order pune municipal corporationSakal

उरुळी कांचन : काही दिवसांपूर्वी नोंद मंजूर करण्यासाठी दहा हजाराची मागणी करून सात हजार रुपये‌ स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे आणि दोन संगणक चालक योगेश कांताराम तातळे (वय २२, रा. चौधरी पार्क, दिघी पुणे), विजय सुदामा नाईकनवरे (वय ३८, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांना रंगेहाथ पकडले होते.

गुन्हा दाखल झाल्यापासून थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे या फरार होत्या. त्यांच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुर्वीही कवडे या तीन वर्षांत दोन वेळा निलंबित झालेल्या आहेत. अखेर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी १९ मार्चला कवडे यांच्या निलंबनाचे आदेश पारित केले आहेत.

जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे, की निलंबन कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता जेव्हा जेव्हा देण्यात येईल त्यावेळी खासगी नोकरी स्विकारली नाही किंवा खासगी धंदा व व्यापार करीत नाही, अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र जयश्री कवडे यांनी द्यायचे आहे.

तसेच नोकरी केल्यास कवडे या निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील. मंडल अधिकारी जयश्री कवडे यांचे मुख्यालय तहसील कार्यालय जुन्नर हे राहील. तहसिलदारांच्या पूर्वपरवानगीशिवाय जुन्नर मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबन कालावधीत कवडे यांनी खासगी नोकरी स्विकारु नये किंवा धंदा करु नये, त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांचेविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, एका पंचवीस वर्षीय व्यक्तीला त्यांच्या आईच्या आजीच्या वडिलांचे कोलवडी (ता. हवेली) गावात असलेल्या जमिनीची सात बारावरील नाव कमी केल्याचे दिसून आले होते. त्या नावे पुन्हा सातबारा उतारावर घेण्यासाठी आजी व त्यांच्या बहिणींनी हवेली तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता.

तहसीलदार यांनी यांच्या आजीच्या आईच्या वडिलांची नावे सातबारा उतारावर नोंद करण्यासाठी कोलवडीचे तलाठी व थेऊरच्या मंडल अधिकारी यांना आदेश दिला होता. तलाठ्यांनी नोंद केलेला सातबारा मंजूर करण्यासाठी पंचवीस वर्षीय व्यक्ती थेऊर येथील मंडल अधिकारी कार्यालयात पाठपुरावा करत होते.

त्यांनी मंडल अधिकारी जयश्री कवडे यांची भेट घेतली. कवडे यांनी त्यांना विजय नाईकनवरे यांना भेटण्यास सांगितले. नाईकनवरे यांनी नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी यांच्यासाठी दहा हजार रुपयाच्या‌ लाचेची मागणी केली होती.

मंडलाधिकारी कवडे दोन वेळा निलंबित

- मौजे भोसरी येथे एकाच गावात, एकाच गट नबंरमधील फेरफारबाबत जयश्री कवडेंनी तीन वेळा आदेश पारित केले होते. त्यामुळे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांना निलंबित केले होते.

- थेऊर मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असताना १३ मार्च रोजी त्यांच्यासह त्यांच्या दोन संगणक चालकांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा गुन्हा एसीबीने दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com