टाकाऊ पुट्टा आणि सिरींज वापरुन तेरा वर्षीय निनादने तयार केले जेसीबी

एकनाथ पवार
रविवार, 19 ऑगस्ट 2018

वैभववाडी : सतत काहीतरी नवनिर्मीतीच्या प्रयत्नात असलेल्या एडगाव येथील निनाद विनोद रावराणे या बालकाने आता हुबेहुब जेसीबी तयार केला आहे. फक्त टाकाऊ पुट्टा, सिरींज, स्क्रु केरसुणीचे मोडके तुटके हिर आणि क्रॅप पुट्टयाचा वापर करून हे बनविण्यात आले आहे. विशेष म्हणजे सामान्य मशीन प्रमाणे त्याची हालचाल होत असुन हा जेसीबी तालुक्यात  सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

एडगाव रामेश्‍वरवाडी येथील तेरा वर्षीय निनाद हा सध्या सोनाळी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातवीत आहे. अभ्यास, खेळ या व्यतिरिक्त त्याला लहानपणापासुन एक छंद आहे. तो सतत काहीतरी नवनिर्मीती करण्याचा प्रयत्न करीत असतो. यापुर्वी त्याने वयाच्या नवव्या वर्षी गणपतीची अतिशय आकर्षक अशी मुर्ती बनवुन त्याने घरातील नातेवाईकांना आपल्यातील चुणुक दाखविली होती. त्यानतंर त्याने लक्ष वेधुन घेण्यासारख्या अनेक वस्तु बनविल्या. मात्र आता त्याने चक्क जेसीबी तयार करून सर्वाना प्रभावीत केले आहे. हे बनविण्यासाठी त्याने दोन टाकाऊ पुट्टे, १४ सिरींज, केरसुणीचे सात आठ हिर, दहा स्क्रु, दोन क्रॅप पुट्टे अशा साहीत्याचा वापर केला आहे. जेसीबीला असणारा रंग या जेसीबीला देण्यात आला आहे.

सामान्य मशील असणारे  बकेट, बुम, लोडर, स्टॅपिलायसर, चालक कॅबिन, हे सर्व या जेसीबीमध्ये आहेत. त्या जेसीबीप्रमाणेच निनादने बनविलेले जेसीबी देखील हालचाल करते. बकेट किवा लोडर मागे पुढे होणे, याशिवाय अन्य सर्व प्रात्यक्षिक निनाद जेसीबी पाहायला येणाऱ्या करून दाखवितो. त्यामुळे हुबेहुब बनविण्यात आलेले हे जेसीबी सध्या तालुक्यात चर्चेचा कुतुहलाचा विषय ठरला आहे.
 
Web Title: JCB was prepared by Thirteen year-old Ninad with the use of card broad and Syringe