#JeeAdvanced जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे हॉल तिकिट उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

यंदा ही परीक्षा इंडियन इनस्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी, रूरकी यांच्या वतीने घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना "जेईई अॅडव्हानस'च्या https://jeeadv.ac.in/ या संकेतस्थळावर जाऊन हॉल तिकिट अपलोड करता येणार आहे.
 
पुणे :  देशातील भारतीय तंत्रशिक्षण संस्थांमधील (आयआयटी) आभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेचे हॉल तिकिट उपलब्ध झाले आहेत. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा येत्या 27 मेला होणार आहे. 

यंदा ही परीक्षा इंडियन इनस्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी, रूरकी यांच्या वतीने घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना "जेईई अॅडव्हानस'च्या https://jeeadv.ac.in/ या संकेतस्थळावर जाऊन हॉल तिकिट अपलोड करता येणार आहे.

जेईई मेन्स परीक्षा दिलेल्या जवळपास दोन लाख 45 हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आता ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकिट अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JEE advanced test hall ticket available

टॅग्स