जेईई, सीईटी अभ्यासाची घाला सांगड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

पुणे - एमएचटी-सीईटीच्या अभ्यासाची काठीण्य पातळी जेईईप्रमाणेच होणार असल्याचे संकेत आहेत. आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनीच जेईईचा अभ्यास करावा, असा गैरसमज असतो. पण, आगामी काळात सीईटी व जेईईचा अभ्यास संयुक्तरीत्या करणे गरजेचे आहे. जेईई व सीईटीविषयी शंकांचे निरसन करणारे चर्चासत्र शनिवारी (ता. १९) सकाळ विद्या आणि आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राने आयोजित केले आहे.

यंदाची परीक्षापद्धती पाहता अभियांत्रिकी सीईटीचा अभ्यासक्रम वाढविला आहे. आगामी काळात वैद्यकीयप्रमाणेच अभियांत्रिकीसाठीही राष्ट्रीय स्तरावर एकच परीक्षा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जेईईची तयारी करतानाच अभियांत्रिकीच्या चारही वर्षांची भक्कम तयारी होत असते. याविषयीच्या सर्व शंकांबाबत आयआयटीयन्सचे संस्थापक संचालक दुर्गेश मंगेशकर मार्गदर्शन करतील. आठवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे.

जेईई, सीईटी मार्गदर्शन
 कुठे : गणेश कला क्रीडा मंच
 कधी : शनिवार, ता. १९
 वेळ : सायंकाळी ६.३०
 वक्‍ते : दुर्गेश मंगेशकर
 मर्यादित विनामूल्य प्रवेश, नोंदणी आवश्‍यक
 www.vidyaseminars.com

Web Title: JEE CET Study Education Sakal Vidya