उत्तम अभियंता होण्यासाठी ‘जेईई’ अनिवार्य - दुर्गेश मंगेशकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पुणे - वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेला बदल सध्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेतही होताना दिसत आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी देशातील चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणे अवघड नाही. यासाठी, विद्यार्थ्यांनी मेहनत, सातत्य, जिद्द ठेवून एमएचटी-सीईटी आणि जेईई-मेन्सच्या परीक्षांचा अभ्यास करावा, असा कानमंत्र आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक दुर्गेश मंगेशकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘सकाळ विद्या’, ‘आयआयटीयन्स’तर्फे आयोजित चर्चासत्रात प्रा. मंगेशकर यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांचा अभ्यास, भविष्यात अभियांत्रिकीसाठी होणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा तसेच जेईई व एमएचटी-सीईटी अभ्यासाची योग्य सांगड आदी विषयांवर मार्गदर्शन केले. अनेक प्रश्‍नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

प्रा. मंगेशकर म्हणाले, ‘‘अभियांत्रिकीची चार वर्षे एटीकेटी न घेता पूर्ण केल्यास देशात-परदेशात उत्तम पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. याकरिता अकरावीपासूनच अभ्यासाची तयारी करणे अनिवार्य आहेच; पण त्यापलीकडे जाऊन अभ्यास तणावमुक्त करायचा असेल तर आठवी-नववीपासूनच तयारी करणे गरजेचे आहे.’’

प्रा. मंगेशकर यांनी दिलेल्या टिप्स  
 अकरावी-बारावीत मुलांना स्मार्टफोन देऊ नये 
 विद्यार्थ्यांनी रोज एक तास व्यायाम करावा 
 तिन्ही परीक्षांची तयारी अकरावीपासून करा 
 अभ्यास करताना शिक्षक, पालक आणि मित्रांचे मार्गदर्शन घ्यावे 

Web Title: JEE Compulsory for Best Engineer durgesh mangeshkar