‘जेईई’, ‘नीट’ प्रवेश परीक्षांचे अभ्यासतंत्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

‘सकाळ विद्या’ आणि ‘आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्रातर्फे’ विद्यार्थ्यांना उद्या मार्गदर्शन 

पुणे - अभ्यास किती करतो, यापेक्षा कसा करतो यावर परीक्षेतील यश अवलंबून असते, असे शिक्षणतज्ज्ञ म्हणतात. ‘जेईई’ व ‘नीट’साठी विद्यार्थी भरपूर अभ्यास करतात; मात्र प्रत्यक्षात चांगले यश पदरात पडत नाही. यासाठी योग्य मार्गदर्शन व अभ्यास तंत्र आवश्‍यक असते. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ विद्या’ आणि ‘आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्रा’ने रविवारी (ता. १४) सायंकाळी ५.३० वाजता विशेष चर्चासत्र आयोजिले आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ते होणार आहे.

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘जेईई’ व ‘नीट’सारख्या प्रवेश परीक्षांचा नेमका अभ्यास, अभ्यासक्रम, परीक्षांचे स्वरूप, त्यात भावी काळात होणारे बदल व त्यासाठीची तयारी, परीक्षेचे तंत्र, आठवी व अकरावीपासून तयारी करताना लक्ष देण्याच्या बाबी, त्याचबरोबर वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांचा एकत्रित अभ्यास या विषयी या चर्चासत्रात ‘आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे’ संस्थापक संचालक दुर्गेश मंगेशकर मार्गदर्शन करणार आहेत. आठवी ते दहावी व अकरावीचे विद्यार्थी व पालकांसाठी हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे.

चर्चासत्राविषयी
केव्हा - रविवार (ता. १४)
कधी - सायंकाळी ५.३० वाजता
कुठे : कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP), शिवाजीनगर, पुणे
मार्गदर्शक - प्रा. दुर्गेश मंगेशकर
सवलत - विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य
www.vidyaseminars.com या संकेतस्थळावर नोंदणी आवश्‍यक
नोंदणीसाठी संपर्क : ९९२३६४५६७९

Web Title: jee, neet admission exam syllabus technic