esakal | जेजुरीगड विकास आराखड्याचा अजित पवार घेणार आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

जेजुरीगड विकास आराखड्याचा अजित पवार घेणार आढावा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (शुक्रवारी) तीन प्रमुख विषयांवर बैठका आयोजित केल्या आहेत. जेजुरीगड विकास आराखडा, जिल्हा वार्षिक आराखडा आणि कोरोना आढावा या तीन बैठका आहेत. या तीनही बैठका विभागीय आयुक्त कार्यालयात (कौन्सिल हॉल) होणार आहेत. या बैठकांमध्ये जेजुरीगड विकास आणि कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिलतेबाबत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Jejuri gad Development Plan Guardian Minister ajit Pawar take Review)

दरम्यान, पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कृषी व आदर्श गोपालक पुरस्काराचे ऑनलाइन वितरण केले जाणार आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम जिल्हा परिषद मुख्यालयातील शरदचंद्र पवार सभागृहात दुपारी अडीच वाजता आयोजित केल्याचे कृषी सभापती बाबूराव वायकर यांनी सांगितले.

हेही वाचा: पत्नीनेच केला नवऱ्याचा खुन, अन् रचला आत्महत्येचा बनाव

या समारंभात सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांचे कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी, शहर आदर्श कृषीग्राम आणि आदर्श गोपालक पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आदी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: घरात घुसून टोळक्‍याकडून कोंढवे धावडेत महिलेस जबर मारहाण

जेजुरीगड विकास आराखड्याचा आढावा घेऊन, त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. सकाळी नऊ वाजता ही बैठक होणार आहे. त्यानंतर दहा वाजता जिल्हा नियोजन समितीची सभा होणार आहे. नियोजन समितीच्या सभेनंतर शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

loading image