प्लॅस्टिक विक्रेता आढळल्यास कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

जेजुरी : सरकारने प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी जेजुरी नगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. प्लॅस्टिक विक्रेता आढळल्यास तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी सांगितले. 

प्लॅस्टिक बंदीसंदर्भात व्यापारी व विक्रेते यांच्यामध्ये जागृती व प्रबोधन करण्यासाठी नगरपालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, मुख्याधिकारी केदार, गटनेते सचिन सोनवणे, अजिंक्‍य देशमुख, रोहिदास कुंभार, रमेश बयास, नगरसेविका रुक्‍मिणी जगताप, शीतल बयास आदी उपस्थित होते. 

सरकारने 23 मार्चपासून प्लॅस्टिकबंदी जाहीर केली आहे. उपलब्ध प्लॅस्टिक पिशव्या व इतर मालाची तीन महिन्यांत म्हणजे 23 जूनपर्यंत विल्हेवाट लावायची आहे.

विल्हेवाट म्हणजे विक्री नव्हे, असे सांगत मुख्याधिकारी केदार म्हणाले, ''पाच हजार, दहा हजार व पंचवीस हजार रुपये असा तीन वेळा दंड झाल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.'' 

पर्यायी व्यवस्था म्हणून कापडी व कागदी पिशव्या वापराव्यात. त्या जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी महिला बचत गटांना त्याचे उत्पादन घेण्याकरिता पालिकेच्या वतीने प्रोत्साहन दिले जात असल्याचे नगराध्यक्षा सोनवणे यांनी सांगितले. 

जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने थर्माकोलच्या पत्रावळ्या, प्लॅस्टिक पिशव्या मोठया संख्येने सापडतात. प्लॅस्टिक व थर्माकोल मुक्तीसाठी जेजुरीतील व्यापारी व नागरिकांनी एक होऊन पुढाकार घ्यावा व सहकार्य करावे, असे नगरसेवक सचिन सोनवणे यांनी सांगितले. 

व्यापाऱ्यांमध्ये उदासीनता 
जेजुरी पालिकेतील बैठकीसाठी सुमारे पाचशे व्यापाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र बैठकीसाठी केवळ पन्नासच व्यापारी उपस्थित होते. प्लॅस्टिकबंदीबाबत व्यापारी वर्गात उदासीनता दिसून आली. हॉटेलचालक तर बैठकीकडे फिरकलेच नाहीत. 

खेळण्यांची दुकाने अडचणीत 
जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे. येथे प्लॅस्टिक खेळण्यांची दुकाने मोठ्या संख्येने आहेत. प्लॅस्टिकबंदीमध्ये प्लॅस्टिक खेळणीही विकता येणार नसल्याचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी सांगितले. त्यामुळे ही दुकाने अडचणीत आली आहेत.

Web Title: Jejuri Nagar Palika starts implementing Plastic Ban