जेजुरी, नीरा स्थानकात लवकरच दुहेरी फलाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

गुळुंचे - लोहमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम फुरसुंगीपर्यंत आले आहे. पुढील काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेजुरी, नीरा या ठिकाणी दुसऱ्या बाजूने लवकरच फलाटाच्या कामाला सुरवात होईल. त्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. 

गुळुंचे - लोहमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम फुरसुंगीपर्यंत आले आहे. पुढील काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेजुरी, नीरा या ठिकाणी दुसऱ्या बाजूने लवकरच फलाटाच्या कामाला सुरवात होईल. त्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. 

नीरा (ता. पुरंदर) येथील रेल्वे उड्डाण पुलाचे उद्‌घाटन खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, माणिक झेंडे, विराज काकडे, सरपंच दिव्या पवार, सदस्य अनिल चव्हाण, राजेश काकडे, सुजाता दगडे, तसेच पुणे विभागाचे विभागीय प्रबंधक मिलिंद देऊसकर, गौरव झा, योगेंद्र सिंग उपस्थित होते. पुलाचे काम चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. 

सुळे म्हणाल्या, ‘‘गेल्या वेळी नीरा रेल्वे स्थानकाला भेट देऊन येथील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. उड्डाण पूल, स्वच्छता, रंगरंगोटी, छोटे पाणी शुद्धीकरण यंत्र बसवून झाले. गतवेळेच्या तुलनेत या वेळी स्टेशनवर सुधारणा दिसत आहे. रेल्वे पादचारी पुलाचे काम झाल्याने प्रवाशांना सुखरूप लोहमार्ग ओलांडणे सोयीचे झाले आहे. गेल्या वेळी केलेल्या मागण्यांतील काही कामे अद्याप होणे बाकी आहेत. भुयारी मार्गासाठी आर्थिक निधीची कमतरता असून, त्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’ 

हज यात्रेकरूंसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या थोड्या वेळासाठी थांबवाव्यात, तसेच मुस्लिम बांधवांना ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात यावा. 
- विराज काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य 

Web Title: Jejuri Neera station platform will soon double