

Jejuri Accident Video viral
esakal
Ashadhi Wari Accident Jejuri : आषाढी वारीदरम्यान जेजुरी येथे घडलेल्या भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भरधाव ट्रकने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना चिरडल्याच्या या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.