जेऊर ते मांडकी रस्ता पालख्यांसाठी खडतर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

वाल्हे - अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि शेतकऱ्यांनी जलवाहिन्यांसाठी खोदलेले चर यामुळे जेऊर ते मांडकी या सात किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने यंदा संत सोपानकाका व संत गोरोबा यांच्या पालखीचा पंढरीकडे होणारा प्रवास खडतर होणार आहे.

पुरंदर तालुक्‍यातील मांडकी ते जेऊरदरम्यानच्या ओढ्यावरील पूल त्यावर पडलेल्या भगदाडामुळे आणि छोट्यामोठ्या खड्ड्यांमुळे अपघाती बनला आहे. 
जेऊरफाटा ते मांडकी व मांडकी ते वाल्हे या रस्त्यांचीही ठिकठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

दरम्यान, मांडकी ते वाल्हे या पाच किलोमीटर व मांडकी ते जेऊरफाटा व जेऊरफाटा ते वीर या बारा किलोमीटर रस्त्यापैकी सात किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. परंतु याकडे लक्ष दिले जात नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

खड्ड्यांमुळे अपघाताची भीती
संत सोपानकाका व संत गोरोबा यांची पालखी मांडकी-जेऊर मार्गाने पुढे जेऊर फाट्याजवळ पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाला जाऊन मिळते. मात्र मांडकी ते जेऊर फाटा दरम्यानच्या रस्त्याची वाळू वाहतुकीमुळे चाळण झाली आहे. या मार्गावर खड्ड्यांमध्ये वारकऱ्यांचे पाय अडकून अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे व खोदण्यात आलेले चर त्वरित बुजवण्याची मागणी दिंडीकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: jeur mandaki road palkhi