Police inspecting the marriage hall in Theur where ₹14 lakh worth of gold and silver jewellery was stolen during a wedding ceremony.

Police inspecting the marriage hall in Theur where ₹14 lakh worth of gold and silver jewellery was stolen during a wedding ceremony.

Sakal

Pune Crime:'थेऊर येथील विवाह सोहळ्यात १४ लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी'; पुणे सोलापूर रोडवरील मंगल कार्यालये बनली चोरीचे अड्डे !

Theur theft: चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या माळा, चेन, बांगड्या, अंगठ्या आणि चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. या घटनेमुळे थेऊर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी अशा कार्यक्रमांमध्ये अतिरिक्त सुरक्षेची आवश्यकता असल्याची मागणी केली आहे.
Published on

थेऊर : थेऊर येथे विवाह सोहळ्यात चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे १४ लाखांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याने लग्न सोहळ्यात विघ्न!याबाबत अच्युत भालचंद्र भगत (वय -६६, महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, पुणे सातारा रोड, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com