Pune Crime:'पीएमपी प्रवासी महिलांकडील दीड लाखाचे दागिने चोरीला'; महिलेची विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद
“Jewellery Theft in PMPML Bus: शिवाजीनगर ते विश्रांतवाडी मार्गावर ३१ ऑगस्टला पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या हातातील ३० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी कापून नेली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे: पीएमपीने प्रवास करत असलेल्या महिलांकडील दागिने चोरीच्या आणखी दोन घटना घडल्या आहेत. नगर रस्ता, विश्रांतवाडी, खडकी परिसरात या घटना घडल्या. चोरट्यांनी प्रवासी महिलांकडील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले.