जिंजी ते सिंहगड गरूडभरारी मोहिमेचे निम्मे अंतर पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jinji fort to Sinhagad Fort Garudbharari Halfway through the campaign
जिंजी ते सिंहगड गरूडभरारी मोहिमेचे निम्मे अंतर पार

जिंजी ते सिंहगड गरूडभरारी मोहिमेचे निम्मे अंतर पार

खडकवासला : पुण्याचे आग्रावीर, सहस्र दुर्गवीर ॲड.मारूती गोळे यांची जिंजी ते सिंहगड (jinji to Sinhagad Fort) अशी ११०० किलोमीटरची पायी प्रवास गरूडभरारी मोहिम सुरु (campaign began) आहे. या मोहिमेच्या ११ जानेवारी १७ व्या दिवशी ६७८.३८ किलोमीटर (Kilometer) पार केले आहे. म्हणजे गरूडभरारी मोहिमेतील निम्मे अंतर पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: RSA vs IND Live: बुमराहचा आफ्रिकेला दुसरा धक्का

ॲड.गोळे यांनी कोल्हापूर येथे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व तंजावर येथे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर रविवार, दि २६ डिंसेबर रोजी जिंजी किल्ल्यातून गरूडभरारी मोहिमेची सुरूवात झाली. दररोज सुमारे ४० किलोमीटरचा पायी प्रवास करतात. मोहिमेसाठी ३० दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजे २६ जानेवारी २०२२ रोजी सिंहगडावर या मोहिमेची सांगता होणार आहे. आज बुधवारी सकाळी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून आजच्या दिवसाची सुरवात केली. धारवाड येथील मराठा विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालय यानिमित्ताने कार्यक्रम झाला. गोळे यांचे व्याख्यान होते. तर धारवाड महानगरपालिकेचे नगरसेवक शंकर शेळके यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण केला.

गरूडभरारी मोहिमेची दोन कारणे

दोन छत्रपतींची औरंगजेबाला तुरी

स्वराज्याच्या स्वातंत्र्य निर्मीतीसाठी छत्रपती शिवरायांचा आग्रा ते राजगड प्रवास केला. तर छत्रपती शिवरायांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी युद्ध स्वराज्याच्या रक्षणासाठी जिंजी ते सिंहगड प्रवास केला. दोन्ही प्रवास औरंगजेबाच्या कचाट्यातून सही सलामत निसटण्यासाठीचे होते.

दोन छत्रपतींचा दक्षिण दिग्विजय

याच दोन छत्रपती पिता- पुत्रांनी दक्षिण दिग्विजय केला. हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदूस्थानसाठी प्रेरणादायी आहे. त्या पैकी छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून सिंहगडला आले. त्या यंदा घटनेचे हे ३२४ वे वर्ष आहे. म्हणून दोन छत्रपतींची औरंगजेबाला तुरी, दोन छत्रपतींचा दक्षिण दिग्विजय या दोन्ही घटना मराठ्यांच्या आणि देशाच्या इतिहासात महत्वाच्या आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांच्यानंतर स्वराज्याची जबाबदारी छत्रपती राजाराम महाराजांवर आली. छत्रपती राजाराम महाराज जिंजी येथे १६८९ मध्ये आले. त्यांनी जिंजी येथून स्वराज्याचा कारभार नऊ वर्ष केला. त्यामुळे जिंजी ही स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखली जाते. जिंजीतून ते २६ डिसेंबर १६९७ला निघाले होते. शेवटच्या काळात ते प्रकृती ठीक नसल्याने सिंहगडला आले. त्यांचे तीन मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले.

हेही वाचा: UP : 2 सपा नेते, काँग्रेस आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

जिंजी ते सिंहगड गरूडभरारी मोहिमेचा मार्ग

जिंजी, नालूर, उटणगिरी, कृष्णगिरी, होसुर, बेंगलोर, तुमकूर, कातानहल्ली, दादासिदावनहल्ली, हेबाळू, राणेबेन्नूर, हुबळी, टेगुर, बेळगाव, कोल्हापूर, कराड, सातारा, शिरवळ, खेडशिवापूर, शिवापूर, कोंढणपूर, कल्याण, कल्याण दरवाजा, सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराज समाधी समोर मोहिम संपेल.

कशासाठी गरूडभरारी मोहिम

मोहिमेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाचा जागर, निरोगी आरोग्याचा, पर्यावरण रक्षणाचा, गडकोट संवर्धनाचा आणि करण्याचा संदेश ते समस्त भारतीयांना देणार आहेत. जिंजी ते सिंहगड अशी पायी मोहिम कोणी केल्याचे ऐकिवात नाही. असे गोळे यांनी सांगितले.

ध्येयवेडे शिवभक्त मारुती गोळे

ॲड.मारूती गोळे हे स्वराज्यातील पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजीराव गोळे यांचे १४ वे वंशज. त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मारूती हे १० वर्षापासून विविध साहसी मोहिमा यशस्वी करतात. भारतासह जगभरातील सुमारे ११६२ किल्यांवर ते गेले आहेत. त्यांनी २०१७ मध्ये एकट्याने आग्रा ते राजगड हा १२५३ किलोमिटर पायी प्रवास केला. त्यानंतर शिवज्योत १७ ऑगस्ट २०२१ ते २९ ऑगस्ट २०२१ या १३ दिवसात त्यांनी आग्रा ते राजगड हे १२५३ किलोमिटर अंतर आपल्या ३० सहकाऱ्याबरोबर धावत आणली. सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान, वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन व सिंहगड पावित्र्य मोहिमेचा आयोजनात सहभाग आहे.

हेही वाचा: भारताला दोन गोष्टींमुळे पत्करावी लागेल जोखीम; WEF चा इशारा

गरूडभरारी मोहिमेतील रोजची दिनचर्या

रोज सकाळी गुलाबी थंडीत किंवा धुक्यात सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत किमान २० किलोमीटर चालणे. त्यानंतर मग स्वयंपाक, जेवण, कपडे धुणे, थोडासा आराम करीत दुपारी ४ ते ९ ते १० वाजेपर्यंत २० ते २२ किलोमीटर चालणे.मग चांगली जागा पाहून रात्रीचे जेवण करणे. रस्त्याच्या कडेला तंबूत मुक्काम करणे. आग्रा मोहिमेत रोज जास्त चालायचो. दुपारचे ऊन जास्त आहे. त्यामुळे चालण्याची वेळ व अंतर कमी केले आहे. अनेक ठिकाणी जेवणासाठी शिवभक्त बोलवितात. कधी आम्ही तयार करून खातो.

रोजचा आहार

आहार शाकाहारी घेतो. मस्त गुलाबी थंडी होती हायवेवर रोज आपला इडली, भात, उपीट खाऊन वाटचाल करायला सुरवात करतो. दाल राईस, डिंक लाडू (घरचे) अन रोज अर्धा लिटर दूध पितो. दुपारी व संध्याकाळी जेवण करतो. सोबतील सागर थरकुडे, विक्रम पवार २ सवंगडी आहेत. तसेच गॅस सिलेंडर व कार आहे. रोज ४० किलोमीटर चालून पायाला फोड फक्त आले आहेत. त्यासाठी चालताना सँडल वापरतो. चालून थांबल्यावर गरम पाण्यात पाय घालुन बसतो.

हेही वाचा: शाळा अर्ध्या उपस्थितीत सुरु ठेवाव्यात; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिनांक व त्या दिवशी पार केलेले अंतर

 • रविवार, २६ डिसेंबर २०२१ रोजी ३८.३५ किलोमीटर

 • सोमवार, २७ डिसेंबर २०२१ रोजी ३७.९४ किलोमीटर

 • मंगळवार, २८ डिसेंबर २०२१ रोजी ४१.५७ किलोमीटर

 • बुधवार, २९ डिसेंबर २०२१ रोजी ३९.४३ किलोमीटर

 • गुरुवार, ३० डिसेंबर २०२१ रोजी ४१.३१ किलोमीटर

 • शुक्रवार, ३१ डिसेंबर २०२१ रोजी ३६.७० किलोमीटर

 • शनिवार, ०१ जानेवारी २०२२ रोजी ३४.३ ९ किलोमीटर

 • रविवार, ०२ जानेवारी २०२२ रोजी ४३ .०१ किलोमीटर

 • सोमवार, ०३ जानेवारी २०२२ रोजी ३९.९० किलोमीटर

 • मंगळवार, ०४ जानेवारी २०२२ रोजी ४०.०९ किलोमीटर

 • बुधवार, ०५जानेवारी २०२२ रोजी ४०.२१ किलोमीटर

 • गुरुवार दि ०६ जानेवारी २०२२ रोजी ४०.५० किलोमीटर

 • शुक्रवार दि ०७ जानेवारी २०२२ रोजी ३८.७३ किलोमीटर

 • शनिवार दि. ०८जानेवारी २०२२ रोजी ३६.२९ किलोमीटर

 • रविवार दि. ०९ जानेवारी २०२२ रोजी ४०.१४ किलोमीटर

 • सोमवार दि. १० जानेवारी २०२२ रोजी ४०.५५ किलोमीटर

 • मंगळवार दि. ११ जानेवारी २०२२ रोजी ४०.३५ किलोमीटर

 • मंगळवार, अखेर एकूण ६७८.३८ किलोमीटर अंतर पार केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top