जितेंद्र गवारेंची माउंट मनास्लू शिखरावर यशस्वी चढाई

सहा महिन्यात तीन अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करण्याचा विक्रम  
जितेंद्र गवारेंची माउंट मनास्लू शिखरावर यशस्वी चढाई
sakal

पुणे : नेपाळमधील गोरखा भागात असलेल्या ‘माउंट मनास्लू’ या आठ हजार १६३ मीटर उंच व जगातील आठव्या उंच शिखराची यशस्वी चढाई करत गिरिप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. गवारे यांनी यापुर्वी एप्रिल महिन्यात माउंट अन्नपूर्णा-१ या जगातील दहाव्या उंच शिखरावर तर मे महिन्यात माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई केली होती. जितेंद्र यांच्या या यशाने नेपाळमधील माउंट मनास्लू शिखरावर देखील भारतीय तिरंगा डौलाने फडकत आहे.

जितेंद्र गवारेंची माउंट मनास्लू शिखरावर यशस्वी चढाई
औरंगाबादेत मुसळधार, बजरंग चौकात पुन्हा साचले तळे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हिमालयातील विविध शिखरांवर यशस्वी चढाई करून भारतीय तिरंगा फडकविण्याचे उद्दिष्ट्य गिरिप्रेमी या संस्थेचे आहे. या मोहिमेबद्दल ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितले की, ‘‘जितेंद्रा हा तयारीचा गिर्यारोहक असून, त्याची मानसिक व शारीरिक तंदरुस्ती वाखाणण्याजोगी आहे. सहा महिन्याच्या आत तीन अष्टहजारी शिखरांची यशस्वीपणे चढाई त्याने केली आहे. याचा सर्व गिरिप्रेमींना आनंद आहे. तर या आधी लेह-लडाख मधील कांग यात्से १ व २ या शिखरांवर, गढवाल हिमालयातील माउंट मंदा-१ शिखरावर गिरिप्रेमीच्या यशस्वी मोहिमा संपन्न झाल्या.

जितेंद्र गवारेंची माउंट मनास्लू शिखरावर यशस्वी चढाई
बारामतीत महावितरणच्या वायरमनला मारहाण

माउंट मनास्लू हे उर्जेचे स्त्रोत व स्फूर्तीदायक पर्वत :

‘माउंट मनास्लू’ हा शिखर जगामध्ये आठवा क्रमांकावर येतो. तसेच मनास्लू हा पर्वत उर्जेचे स्त्रोत व स्फूर्तीदायक पर्वत म्हणून ओळखला जातो. याचे मनास्लू हे नाव संस्कृत भाषेतून आले असून याचा अर्थ ‘बुद्धीजीवी’ असा होतो. या शिखराच्या वाटेवर मोठमोठ्या पर्वतकडांचा व हिमनद्यांचा समावेश आहे. हे सर्व अडथळे पार करून शिखरमाथ्यावर पोहोचल्यानंतर आसपास उभे असलेले साडेसहा हजार मीटरहून उंच असलेले १० हून अधिक शिखरे तर ७ हजार मीटरहून उंच असलेली काही शिखरे नजरेस पडतात.

‘‘अन्नपूर्णा या मोहिमेला जाण्यापूर्वी जितेंद्र यांना कोरोनाची लागन झाली होती. त्यामुळे मोहिमेत सहभाग घेता येणार नसल्याणे त्यांना काहीसा मानसिक ताण निर्माण झाला. पण कोरोनातून बरे झाल्यावर त्यांनी पुन्हा मोहिमेसाठीची तयारी सुरू केली. तसेच गिरिप्रेमीतर्फे राबविण्यात आलेल्या गुरुकुल या प्रकल्पात सहभाग घेतला. मोहिमे दरम्यान त्यांना घर किंवा व्यावसायाचा ताण येऊ नये म्हणून त्यांच्या मागे घराची व व्यवसायाची जबाबदारी मी सांभाळते.’- संजीवनी गवारे, जितेंद्र यांची पत्नी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com