esakal | मुलाखत झाल्यावर मिळाले नोकरीचे पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

post

मुलाखत झाल्यावर मिळाले नोकरीचे पत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : नसरापूर पोस्टात आलेले पत्र ४ ऑगस्ट रोजी संबंधिताकडे पोच होण्याऐवजी तब्बल एका महिन्याने म्हणजे ३ सप्टेंबरला पोच केल्याने नसरापूर पोस्ट ऑफिसचा गलथान कारभार समोर आला आहे. उशिरा मिळालेल्या या पत्रामुळे या तरुणाची भारतीय हवाईदलातील नोकरीची संधी हुकली आहे. त्याने याबाबत पोस्टाच्या वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली आहे.

हेही वाचा: 'युट्युब' पाहून एटीएम फोडणारा मुलगा जेरबंद

नसरापूर येथील भानुदास रामचंद्र शेटे यांनी याबाबत तक्रार केली आहे नसरापूर पोस्ट ऑफिसचा ४ ऑगस्ट २०२१ चा शिक्का आहे. ते पत्र ४ ऑगस्टलाच शेटे यांना मिळणे अपेक्षित असताना त्यांना तब्बल एक महिन्याने म्हणजे ३ सप्टेंबरला मिळाले. या पत्रात शेटे यांना नोकरीच्या मुलाखतीचे आमंत्रण होते. मुलाखत ३१ ऑगस्ट रोजी होती. मात्र, शेटे यांना ३ सप्टेंबर रोजी पत्र मिळाल्याने त्यांची मुलाखतीची संधी हुकली आहे. पोस्टाच्या या गलथान कारभाराचा शेटे यांना खूप मनस्ताप झाला आहे.

हेही वाचा: डाळज येथील राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियम संदर्भात जनजागृती

शेटे यांनी नसरापूर पोस्ट कार्यालयात विचारणा केली असता, येथील पोस्ट मास्तर यांच्याकडून त्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. तर येथील पोस्टमन दिगंबर इंगळे यांनी चूक मान्य करत शेटे यांचे टपाल ३१ जुलै रोजी बुकिंग झाले होते. त्याचा बटवडा ४ ऑगस्ट रोजी होणे अपेक्षित होते. परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे मी ते टपाल ३ सप्टेंबर रोजी शेटे यांना दिल्याचे लेखी स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. नसरापूर पोस्ट मास्तर विजया साबळे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नामसाधर्म्यामुळे शेटे यांचे पत्र दुसरीकडे टाकले गेल्याचे पोस्टमन इंगळे यांचे म्हणणे आहे. याबाबत भानुदास शेटे यांची तक्रार वरिष्ठांकडे पाठवली असून वरिष्ठ याबाबत योग्य ती चौकशी करून निर्णय घेतील.

loading image
go to top