esakal | बनावट बायोडिझेलची विक्री रोखण्यासाठी संयुक्त तपासणी पथक
sakal

बोलून बातमी शोधा

Biodiesel

बनावट बायोडिझेलची विक्री रोखण्यासाठी संयुक्त तपासणी पथक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी बायोडिझेल ( Biodisel) आणि बनावट डिझेलची अवैध विक्री होत असून, त्यातून करचुकवेगिरी वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने पुणे शहरासाठी संयुक्त तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे.

तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक मुंबईत नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यात बायोडिझेल आणि बनावट डिझेलची अवैध विक्री होत असल्याची बाब समोर आली. ही अवैध विक्री रोखण्यासाठी सचिवांनी तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. अवैध बायोडिझेल आणि बनावट डिझेल विक्रेत्यांविरुध्द बायोडिझेल पंपाच्या तपासणीचे अधिकार सरकारी कर्मचाऱ्यांसह तेल कंपन्यांचे भेसळविरोधी पथकास तपासणीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील डिझेल पंपांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

हेही वाचा: परीक्षार्थींनो Best Luck; पोलिस बंदोबस्तात उद्या भरतीची लेखी परीक्षा

या संयुक्त तपासणी पथकाच्या प्रमुख पुरवठा विभागातील तहसीलदार विशाखा काकडे असतील. तसेच, या पथकामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियमचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक मंगेश डोंगरे, भारत पेट्रोलियमचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक सुधांशू कुमार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक अग्रवाल आणि संबंधित भागातील पुरवठा निरीक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.

loading image
go to top