क्षयरोग निर्मूलनासाठी ‘जोश’ पथके

क्षयरोग निर्मूलनासाठी ‘जोश’ पथके
Published on: 

नवी दिल्ली, ता. ७ (पीटीआय) : क्षयरोग निर्मूलनासाठी युवकांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागाला बळ देण्यासाठी केंद्र सरकार ११ राज्यांतील ५५ जिल्ह्यांमध्ये ‘जॉइंट स्क्वाड फॉर हेल्थ’ (जोश) पथके स्थापन करणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली.
ही पथके क्षयरोगमुक्त भारताचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविण्यास मदत करतील, असे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत गुरुवारी येथील भारत मंडपम येथे या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.
आरोग्य मंत्रालय, युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत वर्ग-१ अधिकारी, ‘माय भारत’ स्वयंसेवक आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) छात्र एकत्र येऊन क्षयरोगाविरोधात जनजागृती करतील, असे निवेदनात म्हटले आहे.

अशी करणार जनजागृती

- ही पथके क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंधक उपाय, वेळेवर निदान आणि उपचार पूर्ण करण्याबाबत माहिती देणार
- क्षयरोगासंदर्भातील गैरसमज दूर करणे आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियानात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
- क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये समुदायाचा सहभाग आणि ‘जनभागीदारी’ या महत्त्वाच्या आधारस्तंभांवर वाढत्या भराच्या पार्श्वभूमीवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com