सातवाहनकालीन वस्तू संग्रहालयाच्या जागेची जुन्नरला पाहणी; कोणी केली पाहणी?

दत्ता म्हसकर
बुधवार, 1 जुलै 2020

जुन्नर येथील नियोजित सातवाहनकालीन वस्तू संग्रहालयाच्या जागेची पाहणी डेक्कन कॉलेज, पुरातत्व संचालक व नगर पालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकाने केली आहे.

जुन्नर : जुन्नर येथील नियोजित सातवाहनकालीन वस्तू संग्रहालयाच्या जागेची पाहणी डेक्कन कॉलेज, पुरातत्व संचालक व नगर पालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकाने केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यावेळी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु प्रसाद जोशी, माजी कुलगुरु डॉ.वसंत शिंदे, राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने, सहयोगी प्रा. श्रीकांत गणवीर, जुन्नरच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, बांधकाम विभाग प्रमुख व्ही. एन. देशमुख व सामाजिक कार्यकर्ते  रवींद्र काजळे, राजेंद्र बुट्टे पाटील, जितेंद्र हांडे उपस्थित होते.
-------------- 
मोदींचे बिहार राजकारण : चीनच्या मुद्द्यावर शब्दही नाही छटपूजेचा मात्र आवर्जून उल्लेख
--------------
मोदींच्या भाषणावर राहुल गांधीना आठवला जुना शेर; काय आहे तो शेर?
--------------
शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या ऐतिहासिक जुन्या दगडी गढीतील कॉटेज रुग्णालयाच्या रिकाम्या वास्तूत संग्रहालयाची उभारणी होणार असून भविष्यात किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या शिवसृष्टी जवळील पालिकेच्या जागेत ते नेण्यात येणार आहे याबाबतचा सामंजस्य करार लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले. पुण्याचे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि जुन्नर नगर पालिकेच्या संयुक्त सहकार्यातून हे संग्रहालय होणार असून याबाबतचा सामंजस्य करार व हस्तांतरण याविषयी प्राथमिक चर्चा यावेळी करण्यात आली. 

नगर पालिकेने या संग्रहालयासाठी दहा कोटी निधीची मागणी करण्यात केली असून अद्याप निधी प्राप्त नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.याच बरोबर पद्मावती तलावाचे सुशोभिकरणासाठी राज्य सरकारकडे आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. या तलावाचे सुशोभिकरण करताना येथे अन्य प्रकल्पाच्या अनुषंगाने आणखी काय सुविधा करता येतील. ऐतिहासिक संग्रहालयाचे स्वरुप कसे असावे आदी बाबींची चर्चा  करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: joint team of Deccan College has inspected the site of planned Satavahana Museum at Junnar