"आता 9 आणि 99 रुपयांच्या नोटा काढा”

रविवार, 27 ऑगस्ट 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी अचानक केलेल्या नोटाबंदीनंतर सोशल मिडियावर विनोदांचा पाऊस पडला होता. त्याचप्रमाणे आता आरबीआयने दोनशेची नोट चलनात आणल्यानंतर देखील सोशल मिडियामध्ये काही विनोद सुरू झाले आहेत.

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी अचानक केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा अनेकांनी अजूनही धसका घेतला आहे. त्यातच आता देशात पहिल्यांदाच दोनशे रुपयांची नोट चलनात आली आहे. त्यामुळे पुन्हा आता दोन हजारांची नोट बंद होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. त्यावर आरबीआयने दोन हजार रुपयांची नोट बंद होणार नसल्याचे जाहीर केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी अचानक केलेल्या नोटाबंदीनंतर सोशल मिडियावर विनोदांचा पाऊस पडला होता. त्याचप्रमाणे आता आरबीआयने दोनशेची नोट चलनात आणल्यानंतर देखील सोशल मिडियामध्ये काही विनोद सुरू झाले आहेत.

>विनोद 1 : पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनशेची नोट चलनात आणण्याची काय गरज होती. त्यांनी सांगितले असते की,'' आजपासून दोन हजारच्या नोटेतील शेवटचा शून्य ग्राह्य धरला जाणार नाही... तरी देखील तीच दोन हजाराची नोट दोनशेची म्हणून स्वीकारली असती.''
--------------------------------------------------------------------------------------------
>विनोद 2 : भारताचा एक प्रामाणिक नागरिक आरबीआयला उद्देशून म्हणतो की,

''प्रिय आरबीआय,

कृपया 9 आणि 99 रुपयांची नोट चलनात आणा. कारण मी आता 'ईक्लैईर्स' (Eclairs) खाऊन कंटाळलो आहे.

आपला विश्वासू,
-भारताचा नागरिक''
--------------------------------------------------------------------------------------------
दोनशेची नोट चलनात येण्यापुर्वी सोशल मिडियावर विविध रंगाची दोनशेची नोट व्हायरल झाली होती. त्यावर देखील अनेक विनोद सोशल मिडियावर फिरत आहेत.

>विनोद 3 : एका दुकानातील हा प्रसंग आहे. एक जण एका दुकानात जातो आणि म्हणतो.

एकजण: भाऊ दोनशेची नोट द्या.
दुकानदार: कोणत्या रंगाची देऊ?

सोशल मिडियावर सध्या असे विविध विनोद व्हायरल होत आहेत.

Web Title: jokes on soical media about 9rs note

टॅग्स