journalist nikhil wagle attacked by BJP workers not allow India to become pakistan
journalist nikhil wagle attacked by BJP workers not allow India to become pakistanSAkal

Nikhil Wagle Attacked by BJP Workers : भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला

जिवंत असेपर्यंत संघर्ष करणार, भारताचा पाकिस्तान होऊ देणार नाही - निखिल वागळे

Pune News : पुणे पोलिसांनी तब्बल चार तास घरात स्थानबद्ध केल्यानंतर "निर्भय बनो' सभेसाठी निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक, लाठीहल्ला, शाईफेक, अंडीफेक केली. वागळे यांच्यावर चार ते पाच ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला, त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.

अखेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या कणखर संरक्षणात वागळे थेट सभेसाठी पोचले, आणि तेथूनच त्यांनी ""तुम्ही आम्हाला कधीही मारू शकता, आम्ही निहत्ये आहोत. पण, जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत संघर्ष करणार, भारताचा पाकिस्तान होऊ देणार नाही, '' अशा शब्दात अंगार फुंकले !

दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत "लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा' या विषयावर शुक्रवारी सायंकाळी "निर्भय सभे'चे आयोजन केले होते. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड.असीम सरोदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी यांच्या उपस्थितीत ही सभा होणार होती.

त्यावेळी भाजपने राष्ट्र सेवा दलासमोर आंदोलन केले, त्यास महाविकास आघाडी, समविचारी संघटनांनी जोरदार विरोध दर्शविला, पोलिसांनी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, वागळे हे शुक्रवारी दुपारी पुण्यात आले, त्यानंतर ते डेक्कन परिसरातील त्यांच्या परिचितांकडे थांबले होते. त्या परिसरातही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी वागळे निघाले.

त्यावेळी डेक्कन येथील खंडुजीबाबा चौक येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.डेक्कन ते सभेच्या ठिकाणापर्यंतच्या मार्गावर त्यांच्या गाडीवर तीन ते चार ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला रोखण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला, त्यानंतरही काही ठिकाणी गाडीवर अंडी, शाई फेकण्यात आली, तर काही ठिकाणी दगड मारण्यात आले. त्यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या संरक्षणामुळे वागळे या हल्ल्यातून बचावले आणि सभेच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोचले. त्यामुळे सभेच्या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वागळे सभेच्या ठिकाणी पोचताच, उपस्थित कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला, त्यांनी भाजप विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. "हर जोर जुलूम के टक्कर में, संघर्ष हमारा नारा है' अशी घोषणा देत वागळे यांनी भाषणाला सुरवात केली. वागळे म्हणाले, ""फॅसिझम विरुद्धची ही लढाई आहे, त्यामध्ये महाविकास आघाडीला विजयी करा.

भाजप हे माफिया, गॅंगवार आहे. 40 पोलिसांनी मला घरात नजरकैदेत ठेवले. माझ्यावर हल्ला होणार हे पोलिसांना माहीत असूनही त्यांनी भाजपला हल्ला करण्यासाठी संधी दिली. माझ्यावरील हल्ल्याला पुणे पोलिसच जबाबदार आहेत. आता महाराष्ट्राचा बिहार, उत्तर प्रदेश नाही, तर बिहार, उत्तर प्रदेशचा "महाराष्ट्र' झाला अशी वेळ आली आहे. शिंदे, फडणवीस, दादा महाराष्ट्राला विकायला काढला आहे.''

"यदा कदाचित'नाटकावेळी बॉम्बस्फोट घडविला होता, ललित कला केंद्रावरील हल्लाही त्यांनीच घडविला आहेत. आज ललित कला केंद्रात घुसले, मुसलमांवर बुलडोझर फिरविले. ही माणसे केवळ ललित कला केंद्रावर हल्ला करून थांबणार नाहीत.

ते आपल्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाहीत. हे रामाचे वंशज नाही, तर रामाचे व्यापारी आहेत. त्यांनी अयोध्येत रामाच्या नावाखाली व्यापार सुरू केला आहे. सगळे एकत्र राहू, ही हिटलर व मुसोलिनीविरुद्धची लढाई आहे.

महाराष्ट्र पुरोगामी आहे, त्याला प्रतिगामींच्या हाती देऊ नका, असेही वागळे यांनी स्पष्ट केले. ॲड. असीम सरोदे यांनी वागळे यांच्यावरील हल्ल्याची घटना उपस्थितांना सांगत घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा ठराव करण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी प्रेक्षकांमध्ये बसून वागळे यांना पाठिंबा दिला.

वागळे म्हणाले,

- सीम ऑफिसमध्ये गुंडांना "मॅनेज' करण्यासाठी प्रदीप शर्माची नियुक्ती

- भाजपला लोकसभेला 15 जागा मिळणार, विधानसभेला फटका बसणार

- फॅसिझमविरुद्धच्या लढाईत महाविकास आघाडीने मतभेद विसरून एकत्र काम करावे

- हे रामाचे अनुयायी नाहीत, अंधभक्त आहेत, त्यांच्या मनात केवळ नथूरामच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com