मांजरी - राष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धेत जेएसपीएम अव्वल

JSPM at the National Project Tournament
JSPM at the National Project Tournament

मांजरी - बंगलोर येथे झालेल्या क्वेस्ट इनजेनियम या राष्ट्रीय पातळीवरील प्रोजेक्ट स्पर्धेत जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्पुटर इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्यांनी "स्मार्ट डोमेस्टिक ट्रॉली" असा प्रकल्प सादर केला. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप आहे. "क्वेस्ट ग्लोबल सर्विसेस" या बहू राष्ट्रीय कंपनीच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेतील सोशल मीडियाद्वारे निवडलेल्या "समाजोपयोगी प्रोजेक्ट" आणि "स्ट्रॉंग कॉंटेस्टिंग टीम" हि बक्षिसे सुद्धा महाविद्यालयाने मिळविली आहेत. देशभरातील आयायटी, एनआयटी यांच्यासह ६५० महाविद्यालयातील एकूण ३५००० विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांनी सुमारे ८०० प्रोजेक्ट सादर केले होते. त्यापैकी शंभर प्रोजेक्ट दुसऱ्या फेरी साठी तर फक्त दहा प्रोजेक्ट अंतिम फेरी साठी निवडण्यात आले होते.

जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आयुष्य अगरवाल, मधुली सुवर्णकर, निवेदिता शेळके व पुष्प चेट्टीयार यांनी डॉ. दत्तात्रय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली  " स्मार्ट डोमेस्टिक गॅस ट्रॉली "  हा प्रोजेक्ट सादर केला. मोबाइल अँपद्वारे गृहिणींना दैनंदिन गॅस वापर, गॅस लिकेज, फायर अलार्म, गॅस बुकिंग इत्यादी सेवा या ट्राँलीतून मिळू शकतात.

"सावंत महाविद्यालयाचे सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक यांनी मिळविलेल्या यशाबद्दल "एअर बस इंडिया " च्या वतीने अमेरिका वारीची खास सोय करण्यात आली आहे. तसेच क्वेस्ट ग्लोबल सर्विसेस मध्ये (QuEST Global Services Pvt Ltd ) नोकरीची संधीही देण्यात आली आहे. या प्रोजेक्टचे मार्केट लॉन्चिंग करण्यासाठी आघाडीच्या उद्योगांनी संपर्क साधला असून या बाबतची बोलणी अंतिम टप्यात आहे.' अशी माहिती संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे यांनी दिली.

महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थापक सचिव प्रा. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक सत्कार करण्यात आला. संकुल संचालक डॉ. संजय सावंत, प्रा. डॉ. एम. जी. जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. याबरोबरच पालक, शिक्षक व इतर विद्यार्थ्यांकडून या यशाचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com