चीन, युरोप देशात द्राक्ष निर्यात ठप्प :  जम्बो द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत

Jumbo grape Farmers in trouble as exports to China and Europe Stop
Jumbo grape Farmers in trouble as exports to China and Europe Stop
Updated on

नारायणगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीमूळे चीन, युरोप देशातून द्राक्षांना या वर्षी मागणी नसल्यामूळे जुन्नर तालुक्यातुन होणाऱ्या जम्बो द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला आहे. यामुळे निर्यातक्षम जम्बो द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. प्रतिकुल हवामानामुळे उत्पादनात झालेली घट व द्राक्ष निर्यातीवर झालेला परिणाम या चक्रात द्राक्ष उत्पादक सापडले आहेत.३ जून २०२० रोजी झालेले निसर्ग चक्री वादळ , बागांची ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर सात व आठ जानेवारी २०२१ रोजी  तालुक्यात झालेला मुसळधार पाऊस या मुळे या वर्षी द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे.


हद्द झाली! चोरट्यांनी पुण्याच्या एसीपींचा किंमती श्वान पळवला; अन्...
चार हजार एकर पैकी सुमारे एक हजार एकर क्षेत्रात घड निर्मितीच झाली नाही.तर उर्वरीत बागांना अपेक्षित घड निर्मिती झाली नाही. एकरी तीन लाख रुपये खर्च करून जम्बो द्राक्षाचे एकरी  तीन ते पाच टन उत्पादन निघत आहे. उत्पादनात पन्नास टक्के घट झाली आहे.या मुळे या वर्षी प्रतिकिलोग्रॅम सुमारे सत्तर रुपये उत्पादन खर्च झाला आहे. उत्पादनात पन्नास टक्के घट झाल्याने निर्यातक्षम जम्बो द्राक्षाला प्रतिकिलोग्रॅम किमान शंभर रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा असताना प्रतिकिलोग्रॅम सत्तर ते ऐंशी रुपये भाव मिळत आहे. या बाजारभावात जेमतेम भांडवली खर्च वसूल होणार आहे. तालुक्यातील निर्यातक्षम जम्बो द्राक्षाचा तोडणी हंगाम भरात आला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीमूळे चीन, युरोप देशातून द्राक्षांना मागणी नसल्यामूळे बाजार भावात घट झाली आहे.

सध्या येथील व्यापारी रोहिदास घोलप, शीतलदास कटणीवाले,चाँद फ्रुट कंपनी हे बांगलादेश, दुबई,कलकत्ता  बाजारपेठेत जम्बो द्राक्ष विक्रीसाठी पाठवत आहेत.या मूळे जम्बो द्राक्षाला प्रतिकिलोग्रॅम सत्तर ते ऐंशी रुपये भाव मिळत आहे.

'वाघा बॉर्डरपेक्षा वाईट परिस्थिती आंदोलनस्थळी'; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर ओढले ताशेरे


''चीन, युरोप देशातून द्राक्षांना मागणी नसल्याने तालुक्यातुन बांगलादेशांत रोज पन्नास टन जम्बो द्राक्ष पाठवली जात आहे.आज अखेर जुन्नर, आंबेगाव तालुक्यातुन सुमारे चारशे टन जम्बो द्राक्ष बांगलादेशात पाठवली आहे.बांगलादेशाची पर्यायी बाजारपेठ उपलब्ध झाल्याने अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जम्बो द्राक्षाला प्रतवारी नुसार प्रतिकिलोग्रॅम ७० रुपये ते ८० रुपये भाव मिळत आहे.''
- रोहिदास घोलप,  बांगलादेश : द्राक्ष निर्यातदार

''मागील वर्षी डीजे एक्स्पोर्ट कंपनीने चीन, युरोप देशात आज अखेर १२ टन क्षमतेचे ८० कंटेनर पाठवले होते.या वर्षी आज अखेर बारा कंटेनर पाठवले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीमूळे तसेच  जानेवारी महिन्यात झालेल्या पावसामुळे द्राक्ष मण्यांना सूक्ष्म क्रॅकींग असल्याने व लस्टर नसल्याने चीन, युरोप देशात द्राक्षाला आद्यप मागणी नाही.याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे.''
​- बिजू जोसेफ, डीजे एक्स्पोर्ट कंपनी, येडगाव

कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र विद्यार्थ्यांनो, UGCची नवी नियमावली जाहीर!

''अतिशय प्रतिकुल परिस्थितीत द्राक्ष उत्पादन घेतले आहे.मात्र योग्य भाव नसल्याने द्राक्ष उत्पादक सलग दुसऱ्या वर्षी अडचणीत सापडले आहेत. मागील वर्षी मार्च मध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाची प्रतीकिलो दहा रुपये दराने विक्री करावी लागली होती.पावसामुळे झालेल्या नुकसानीचे दोन वेळा पंचनामे झाले.मात्र आद्यप एक रुपया सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही. शासनाचे द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीकडे दुर्लक्ष आहे. ''
- अमोल पाटे, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com