कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

आळंदी वीज मंडळ कार्यालयातील कनिष्ठ अभियंता गणेश पांडुरंग जरंडे (वय-२८, रा.शिरवली, ता.बारामती) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने आज दुपारी पाच हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

आळंदी : आळंदी वीज मंडळ कार्यालयातील कनिष्ठ अभियंता गणेश पांडुरंग जरंडे (वय-२८, रा.शिरवली, ता.बारामती) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने आज दुपारी पाच हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले की, आळंदीतील वीज मंडळाच्या ग्रामिण कार्यालयात गणेश जरंडे हा कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता. तक्रारदार व्यक्तीचे खंडित वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवणे आणि नविन मिटर मंजुरीसाठी जरंडे याने सुरूवातीला दहा हजार रूपयांची मागणी केली होती. मात्र आज पाच हजार रूपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने दुपारी जरंडे याला लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले.घटनास्थळी पंचनामा आणि अटकेची कारवाई सुरू आहे.

Web Title: junior engineer catch while taking bribe