जुन्नरकरांनो, कोरोनाचा आकडा वाढतोय; आज पोलिस अधिकारी अडकला कोरोनाच्या जाळ्यात!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

लेण्याद्री येथील कोविड केंद्रात १७ तर पुणे येथे ७ जण उपचार घेत आहेत.

जुन्नर : गेल्या काही दिवसांपासून जुन्नरमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी (ता.२८) नव्या पाच कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. ओतूर पोलीस ठाण्यातील एका तरुण पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे.

तसेच वारुळवाडी, विठ्ठलवाडी-येणेरे, संतवाडी-आळे आणि जुन्नर येथील चारजणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ५८ झाली आहे. यापैकी ३२ जण बरे झाले आहेत, तर २४ जणांवर उपचार सुरू आहेत. औरंगपूर आणि मोकासबाग येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

- लॉकडाउनमध्ये 'स्पाईसजेट’ने पुण्यातून केली विक्रमी माल वाहतूक​; वाचा सविस्तर!

लेण्याद्री येथील कोविड केंद्रात १७ तर पुणे येथे ७ जण उपचार घेत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यातील रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता देखील वाढत चालली आहे. जुन्नर शहरात दुसरा रुग्ण आढळून आला आहे. उंब्रज, ओतूर, आळे आणि सावरगाव येथील रुग्णांचे संपर्कातील एकूण ३२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

- Feel the Beat : कोरोना संकटात ड्युटी बजावणाऱ्या 'खाकी किंग'ची गौरवगाथा; वाचा सविस्तर!

गावनिहाय कोरोना रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे:-
डिंगोरे - १ (बरा), सावरगांव - ५ (बरे), मांजरवाडी - २ (बरे), पारुंडे - ३ (बरे), आंबेगव्हाण - २ (बरे), धोलवड - ३ (बरे), धालेवाडी तर्फे मिन्हेर - १ (बरा), विठ्ठलवाडी - वडज - १ (बरा), शिरोली तर्फे आळे २ (बरे), खिलारवाडी - १ (बरा), कुरण - १ (बरा), चिंचोली - ३ (बरे), ओतुर - २ (बरा), जुन्नर-  १ (बरा), राजुरी - १ (बरा), नवलेवाडी - १ (बरा), धामणखेल - १ (बरा), कुसुर- १.
मृत्यू :- औंरगपूर - १ (मृत्यू), मोकासबाग-१ (मृत्यू), 
अॅक्टिव्ह :- बोरी- ३, खामुंडी- ७, खानापूर- ३, शिरोली खुर्द- ३, उंब्रज नंबर एक- १. धनगरवाडी - १, ओतूर- १, वारूळवाडी- १, विठ्ठलवाडी- १, संतवाडी- १, वारुळवाडी- १, जुन्नर- १. एकूण रुग्ण ५८, मृत्यू - २, बरे ३२, ऍक्टिव्ह - २४

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Junnar 5 new corona cases found on Sunday 28th June