लॉकडाउनमध्ये 'स्पाईसजेट’ने पुण्यातून केली विक्रमी माल वाहतूक​; वाचा सविस्तर!

SpiceJet_Airline
SpiceJet_Airline

पुणे : देशातील सर्वात मोठी एअर कार्गो ऑपरेटर व मालवाहू विमानांचा खास ताफा बाळगणारी एकमेव देशी कंपनी असणाऱ्या ‘स्पाइसजेट’ने 25 मार्चपासून आत्तापर्यंत पुण्याकडे व पुण्यातून 55 टन इतकी विक्रमी मालवाहतूक केली आहे. यासाठी या कंपनीच्या 14 मालवाहू विमानांनी उड्डाणे केली असून प्रवासी विमानांचाही त्यासाठी वापर करण्यात आला आहे. 

विविध आंतरराष्ट्रीय ठिकाणीदेखील या कंपनीने अनेक मालवाहू उड्डाणे केली आहेत. ‘स्पाइसजेट’ने मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे यांसह संपूर्ण महाराष्ट्रात हजार 588 टन मालवाहतूक केली आहे. महाराष्ट्रातून व महाराष्ट्राकडे अशी 552 उड्डाणे 25 मार्चपासून या कंपनीने केली आहेत. 

‘स्पाइसजेट’च्या दृष्टीने पुणे हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. आपल्या खास मालवाहू विमानांच्या ताफ्यातून अत्यावश्यक वस्तू व वैद्यकीय सामानाची ने-आण करून ‘स्पाइसजेट’ने टाळेबंदीच्या काळातही मालवाहतूक सुरळीत ठेवली. 26 मार्चपासून या कंपनीने मालवाहतुकीची देशांतर्गत 14 उड्डाणे पुण्याकडे व पुण्यातून केली. यामध्ये बंगळुरू, दिल्ली, मुंबई व नागपूर या शहरांमधून झालेल्या उड्डाणांचा समावेश आहे.

‘स्पाइसजेट एअरलाइन’ने मुंबईत येणारी व मुंबईहून जाणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करणारी 162 उड्डाणे केली व त्यांमधून 2,490 टन माल नेला. अबू धाबी, बाहरीन, बँकॉक, कंबोडिया, ढाका, दुबई, जेद्दा, काठमांडू, कुवेत, मस्कत, म्यानमार, रस अल खैमाह, रियाध, शारजा आणि सिंगापूर या ठिकाणची ही ने-आण करणारी उड्डाणे होती. 

स्पाईसजेटने औरंगाबाद येथून मालाची ने-आण करणारी दिल्ली व मुंबई येथील 2 देशांतर्गत उड्डाणेही केली व तींमधून 4.5 टन माल वाहिला. नागपूरहून पुणे, दिल्ली व मुंबई अशी 19 देशांतर्गत उड्डाणे करून त्यांतून 69 टन मालाची वाहतूकही ‘स्पाइसजेट’ने केली.

‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, “अत्यावश्यक वस्तू, थंड हवामानात ठेवण्याजोग्या वैद्यकीय वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे व मदत साहित्याचा पुरवठा कमीतकमी वेळेत व्हावा, यासाठी आपला मालवाहू विमानांचा ताफा ‘स्पाइसजेट’ने वापरला आहे. देशात टाळेबंदी सुरू केल्यापासून जवळपास 2 हजार 570 उड्डाणांमधून 18 हजार 100 टन मालाची वाहतूक  कंपनीने केली आहे. हे प्रमाण सर्व देशांतर्गत विमान कंपन्यांच्या एकत्रित क्षमतेच्याही दुप्पट आहे. आमची मालवाहतूक आणि प्रवासी सेवा या दोन्ही गोष्टींसाठी पुण्यात आम्हाला प्रचंड क्षमता दिसली आहे आणि आम्ही आगामी काळात या क्षमतेचा विस्तार करीत राहणार आहोत.”

देशात टाळेबंदी सुरू झाल्यापासून ‘स्पाइसजेट’ने आपली आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. अबू धाबी, आलमाटी, बगदाद, बाहरीन, बँकॉक, बिश्केक, कंबोडिया, कैरो, सेबू, कोलंबो, ढाका, दोहा, दुबई, गुआंगचौ, हो चि मिन्ह, हाँगकाँग, हुआंगझू, इंचेऑन, जकार्ता, काबुल, काठमांडू, खार्टूम, किर्गिस्तान, कौलालंपूर, कुवेत, माले, मॉस्को, म्यानमार, शांघाय, शारजा, सिंगापूर, सुलैमानिय्या, ताश्कंद, युक्रेन आणि इतर अनेक ठिकाणी ही सेवा आता वाढली आहे. आज, ‘स्पाइसजेट’चे मालवाहू नेटवर्क 45 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर पसरलेले आहे आणि त्यापैकी बहुसंख्य ठिकाणे ही टाळेबंदीच्या कालावधीत जोडली गेलेली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

‘स्पाइसजेट एअरलाइन्स’ने आपला समर्पित कार्गो विभाग, स्पाइसएक्सप्रेस, हा सप्टेंबर 2018 मध्ये सुरू केला होता. ‘स्पाइसजेट’ने आपल्या ‘क्यू-400’ श्रेणीतील 3 विमानांचे रुपांतर मालवाहू विमानात नुकतेच केले आहे. मध्यम व लहान शहरांमध्ये चालविण्यासाठी ती विमाने विशेष उपयुक्त आहेत. या कंपनीकडे आता आठ मालवाहू विमानांचा समर्पित ताफा आहे.

सात एप्रिल रोजी ‘स्पाइसजेट’ने प्रवासी केबिन आणि ‘बेली स्पेस’मध्ये वैद्यकीय आणि जीवनावश्यक वस्तू ठेवून भारतात प्रथमच ‘आसनावर माल’ स्वरुपाचे उड्डाण केले. तेव्हापासून, आम्ही प्रवासी केबिनमध्ये मालवाहतूक करण्यासाठी नियमितपणे आमची ‘B737’ आणि ‘Q400’ प्रवासी विमाने तैनात करीत आहोत, असे अजयसिंह यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com