

Three Leopard Cubs Found During Sugarcane Harvesting
Sakal
राजेश कणसे
आळेफाटा : बोरी बुद्रुक येथील एका शेतात ऊस तोडणी चालू असताना बिबट्याची तीन पिल्ले सापडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील कैलास जाधव या शेतकऱ्याचा ऊस तोडायचे काम चालु असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ऊस तोडण्या-या कामगारांना साधारण अंदाजे दोन महिने वयाची दिवसाची तीन लहाने बिबट्याची पिल्ले आढळुन आल्यानंतर ऊस कामगारांनी शेताचे मालक जाधव यांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर जाधव यांनी वन अधिकाऱ्यांना फोन करून बोलावले. घटनास्थळी वनपाल गणेश बागडे , वनरक्षक - महेश जगधने व ऋषिकेश गायकवाड यांनी पिल्लांना माणिक डोह येथील बिबट्या निवारण केंद्रात नेऊन सोडले आहे.