जुन्नरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढला; आज आढळले एवढे रुग्ण

corona virus.jpg
corona virus.jpg

जुन्नर, ता.१४ : मुंबईला कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी एका कुटुंबातील तिघेजण जुन्नरला मूळगावी आले असल्याचे सांगण्यात आले आहे. जुन्नरला कोरोना बाधित रुग्णांची संख्या  १४८ झाली  असून  आज नव्याने औरंगपूरला तीन तर नारायणगाव, वारूळवाडी येथे प्रत्येकी एक असे पाच रुग्ण वाढले असून एक बरा झाला आहे. एकूण ७३ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर ७२ रुग्ण उपचार घेत आहेत. 

स्वयंसेवकांमुळे धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येत असेल, तर नागपूरला स्वयंसेवक...
औरंगपूर येथे मुंबईत असलेल्या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. तर नारायणगाव व वारुळवाडी येथील रुग्ण संपर्कातील आहेत. मोकासबाग व पिंपळगाव-आर्वी येथील प्रत्येकी एक अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल  उपचार घेणारे सर्वाधिक रुग्ण धनगरवाडी ,धालेवाडी तर्फे हवेली, जुन्नर, वारुळवाडी व नारायणगाव येथे पाच पेक्षा अधिक रुग्ण आहेत. आजपर्यत १३९५ संशयित कोरोना रुग्णांची स्वब तपासणी करण्यात आली आहे. आज ६१ स्वब नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
बाहेरून आलेल्या ३५६२ जणांपैकी २५ संस्थात्मक तर  ३५४० होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com