जुन्नर : देवराम लांडे यांना न्यायालयाचे समन्स

वायाळ यांनी आपल्या बदनामी प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली लांडे यांच्या विरोधात जुन्नर न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
Court
CourtSakal

जुन्नर : पोलीसांच्या चौकशी अहवालानंतर जुन्नर न्यायालयाने (Junnar Cout) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य देवराम लांडे (Deoram Lande) यांना समन्स जारी केले आहे अशी माहिती नॅशनल पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष मारुती वायाळ व अॅड. अजिज खान यांनी पत्रकारांना दिली.

वायाळ यांनी आपल्या बदनामी प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली लांडे यांच्या विरोधात जुन्नर न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. याबाबत न्यायालयाने जुन्नर पोलीसांकडून चौकशी अहवाल मागविला होता. या अहवालाचे आधारे न्यायालयाने देवराम लांडे यांच्या विरुध्द भारतीय दंड विधान कलम ५००, ५०४, ५०६ प्रमाणे समन्स जारी केले आहे.

Court
डॉ.मनिष परदेशी दुबई क्रिकेट बोर्डच्या हेड स्पोर्ट्स फिजिओथेरेपिस्ट पदी

लांडे यांनी २०१७ मध्ये दसरा मेळाव्यात मारुती वायाळ यांचे नाव घेऊन बदनामी करत पुरावा नसताना भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले होते. त्या आरोपांची व्हिडीओ क्लीप ते ग्रुप अॅडमीन असलेल्या "आदिवासी भगव वादळ" या व्हाटस्-अॅप ग्रुपवर पोस्ट केली होती. तसेच यु टयुब वर सदरचा व्हिडीओ अपलोड झाला होता. वायाळ राजकिय प्रतिस्पर्धी असल्याने लांडे यांनी खोटा अपप्रचार करून बदनामी केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com