जुन्नर - खडकुंबेला केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन        

दत्ता म्हसकर
शनिवार, 24 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : खडकुंबे (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष झंपु गारे, केंद्रप्रमुख वा.दा.शेळके खडकुंबे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यावेळी उपस्थित होते.

शिक्षकांनी गुणवत्तेच्या बाबतीत कमी पडता कामा नये असे आवाहन शेळके यांनी केले. प्रास्ताविक सुभाष मोहरे यांनी केले. उमेश शिंदे यांनी पालक व शिक्षक यांची गुणवत्ते विषयी भूमिका व RTE अधिनियम 2009 याबाबत सविस्तरपणे माहिती याविषयी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य याविषयी सुभाष मोहरे यांनी माहिती दिली. केंद्रातील पूर शाळेतील उपक्रमाचे ई-लर्निंग द्वारे  नंदकुमार साबळे यांनी सादरीकरण केले.

शेळके कृती संशोधन व इतर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम याबाबत शेळके यांनी माहिती दिली. 2018-2019 या शैक्षणिक वर्षांतील इयत्ता पहिलीच्या खडकुंबे शाळेतील मुलांच्या प्रवेशाचे स्वागत व सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वही, पेन आणि गुलाब पुष्प देउन करण्यात आला. याप्रसंगी खडकुंबे शाळेतील मुख्याध्यापक मोधे शिक्षक दिघे, अभंग यांनी  कार्यक्रमाचे संयोजन केले. 

Web Title: junnar khadkumbela organised central level education meet