Kunbi Certificate Camp : जुन्नरला कुणबी दाखला शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

महसूल विभागाच्या वतीने आज शुक्रवार ता.०२ रोजी कुणबी दाखला काढण्यासाठी आयोजित केलेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Junnar Kunbi Certificate Camp
Junnar Kunbi Certificate Campsakal

जुन्नर - महसूल विभागाच्या वतीने आज शुक्रवार ता.०२ रोजी कुणबी दाखला काढण्यासाठी आयोजित केलेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मराठा समाज बांधवांनी कुणबी दाखले काढण्याची प्रक्रिया समजावून घेतली.

जुन्नर तालुका पंचायत समिती सभागृहात मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, निवासी नायब तहसीलदार सारिका रासकर, सुनील ढोबळे, संदेश बारवे, गणेश महाबरे व मराठा समाज बांधव उपस्थित होते. सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नरच्या वतीने तहसीलदारांकडे कुणबी दाखल्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्याची मागणी करण्यात आली होती.

या शिबिरात तहसीलदार सबनीस यांनी दाखला कसा काढावा यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, वंशावळ, मोडलिपी भाषांतर याविषयी सविस्तर माहिती दिली. मराठा बांधवांच्या विविध शंकाचे निरसन केले तसेच कुणबी नोंदी आढळलेल्या गावातून कुणबी दाखल्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी सरपंच अमित ढोले यांनी मार्गदर्शन कक्ष तहसील कार्यालयात मार्गदर्शन कक्ष करण्यात यावा अशी मागणी केली. संदेश बारवे यांनी दाखल्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी अशी सूचना केली. सुनील ढोबळे, निलेश गुंजाळ तसेच अनेक पुरुष व महिलांनी देखील विविध प्रश्न विचारून माहिती घेतली.

सकल मराठा समाजाचे प्रमोद खांडगे, विवेक पापडे, प्रवेश देवकर, अरुण मोरे, अमित ढोले, शिवम घोलप, सौरभ गुंजाळ, नरेंद्र कासार आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बारवे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com