Kunbi Certificate : जुन्नरला शुक्रवारी कुणबी दाखल्यासाठी मार्गदर्शन शिबिर

शिबिरात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळलेल्या समाज बांधवांनी सहभागी होऊन कुणबी दाखले काढण्याची प्रक्रिया समजावून घ्यावी असे आवाहन करण्यात आले
junnar kunbi certificate guidance program maratha reservation ravindra sabnis
junnar kunbi certificate guidance program maratha reservation ravindra sabnisSakal

जुन्नर : कुणबी दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे,वंशावळ आदी माहिती देण्यासाठी शुक्रवार ता.०२ रोजी जुन्नर तालुका पंचायत समिती सभागृहात सकाळी १० वाजता मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.

याबाबत सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नरच्या वतीने मंगळवार ता.३० रोजी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. या शिबिरात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळलेल्या समाज बांधवांनी सहभागी होऊन कुणबी दाखले काढण्याची प्रक्रिया समजावून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा समन्वयकांनी,समाज प्रतिनिधी, युवकांनी तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी मिळालेल्या समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाचे वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com