400 Leopard Traps Deployed Across Four Talukas
Sakal
निरगुडसर : जुन्नर वनविभागातील जुन्नर,शिरूर,आंबेगाव आणि खेड या चार तालुक्यात बिबट्यांना पकडण्यासाठी एकूण ४०० पिंजरे तैनात करण्यात आले आहेत,बहुतांश ठिकाणी पिंजरे उपलब्ध झाले असले तरी बिबट्यांपासून संरक्षणासाठी असलेल्या यंत्रणांची मात्र वानवा पाहायला मिळत आहे,वनविभागाची यंत्रणा अलर्ट आहे पण सरकार नव्याने यंत्रणा पुरवण्यात अलर्ट दिसून येत नाही त्यामुळे सरकारला बिबट्या बाबत गांभीर्य आहे की नाही?असा सवाल उपस्थित राहत आहे.