Junnar: बाजार समितीच्या निवडणुकीची प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर : बाजार समिती

जुन्नर : बाजार समितीच्या निवडणुकीची प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध

जुन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. बाजार समितीच्या चार मतदार संघात एकूण ३ हजार ५१ मतदार आहेत. मतदार यादी कार्यक्रमानुसार मतदार यादीवर २२ नोहेंबरपर्यंत आक्षेप व हरकती नोंदविता येणार आहेत. मतदार यादीवर नोंदविलेल्या हरकती व आक्षेपांवर एक डिसेंबर रोजी निर्णय घेण्यात येईल व ६ डिसेंम्बरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर व बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी सांगितले.

सोसायटी मतदार संघात एकूण ८६६ मतदार असून यात १ प्रशासक मतदार आहे तर तीन मृत सदस्यांची मतदार नोंद झाली आहे. ग्रामपंचायत मतदार संघांत एक हजार ६७ मतदार आहेत. यात ग्रामपंचायत सदस्य एक हजार ११ असून ३६ ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने ते मतदार आहेत तर सदस्यांच्या २० जागा रिक्त आहेत. व्यापारी अडत्या मतदारसंघात ९९४ व हमाल तोलारी मतदार संघात १८१ असे एकूण तीन हजार ५१ मतदारांचा समावेश प्राथमिक यादीत करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुणे : कोंबिग ऑपरेशन करून गुन्हेगारांवर कारवाई

बाजार समितीची संचालक मंडळाची मुदत मागील वर्षी ३ ऑक्टोबर २० रोजी संपली होती. कोरोनामुळे संचालक मंडळास सुमारे एक वर्ष मुदतवाढ मिळाली होती.बाजार समित्यांच्या निवडणूक दोन टप्प्यात होणार आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून २२ डिसेंबर पर्यंत नामनिर्देश पत्र दाखल करता येतील.२३ डिसेंबरला छाननी होऊन २४ डिसेंबरला वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यांनतर ७ जानेवारी २२ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर १७ जानेवारीला मतदान व १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा: पुणे : समाविष्ट मतदारांचे फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्याची मागणी

या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची संख्या एक ने कमी झाली आहे. सोसायटी मतदार संघातून ११, ग्रामपंचायत मतदार संघातून ४, व्यापारी मतदार संघातून २ व हमाल मापाडी मतदार संघात एक अशा एकूण अठरा जागांसाठी निवडणूक होणार आहे. पणन मतदार संघातील एक जागा कमी झाली असल्याचे बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी सांगितले.

loading image
go to top