जुन्नरच्या विविध प्रश्नांसाठी आमदार सोनावणे दिल्ली दरबारी

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी आज दिल्ली येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी खेडचे आमदार सुरेश गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे , संचालक निवृत्ती काळे त्यांच्या समवेत होते.

जुन्नर तालुक्यातील दाऱ्या घाटासाठी वनविभागाची परवानगी मिळावी, लेण्याद्री येथील दर्शन शुल्क तातडीने बंद करण्यात यावे, शिवनेरी किल्ला ते लेण्याद्री रोप वे व्हावा, शिवनेरीवरील अंबरखाना वास्तूत शिवकालीन वस्तू व शस्त्रास्त्र संग्रहालय व्हावे, माहिती पटासाठी थिएटर अशा विविध मागण्या आमदार शरद सोनवणे यांनी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समवेत दिल्ली येथे जाऊन वरील कामे लवकरात लवकर मार्गी लावावी अशी विनंती केली. 

Web Title: junnar mla sonawane meets minister mahesh sharma at delhi