जुन्नर नगर परिषदेची दहा प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

अंतिम मतदार यादी १ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे
 जुन्नर
जुन्नरsakal

जुन्नर : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जुन्नर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज मंगळवार ता.२१ रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही मतदार यादी ऑन लाईन देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर २१ ते २७ जून या कालावधीत नगर परिषद कार्यालयात हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.त्यानंतर अंतिम मतदार यादी १ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी ५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जुन्नर नगर परिषदेची प्रभाग रचना व आरक्षण सोडत यापूर्वी प्रसिद्ध झाली आहे.

एकूण दहा प्रभागातुन २० सदस्य निवडून द्यायचे आहेत यात दहा महिलांचा समावेश आहे. नगर परिषदेच्या दहा प्रभागात एकूण २२ हजार २३६ मतदार असून यात पुरुष ११ हजार ३१२ पुरुष तर १० हजार ९२४ महिला आहेत. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सर्वाधिक ३ हजार १० तर प्रभाग पाच मध्ये सर्वात कमी १ हजार ८४८ मतदार आहेत. जुन्नर प्रभागनिहाय आरक्षण व मतदार संख्या

पुढील प्रमाणे :-

प्रभाग १- अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार २,२३८.

प्रभाग २- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार २०६२.

प्रभाग ३- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार १,८९३.

प्रभाग ४- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण,एकूण मतदार २,७४७.

प्रभाग ५- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार १,८४८.

प्रभाग ६- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार १,९२५.

प्रभाग ७- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार २,३३३.

प्रभाग ८- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार २,२३०.

प्रभाग ९- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार ३,०१०.

प्रभाग १०- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार १,९५०. सोबत फोटो

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com