जुन्नरला मुस्लिम आरक्षण हक्क परिषदे संपन्न

दत्ता म्हसकर
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

जुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या परिषदेस तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन जुन्नर तालुका अध्यक्ष अमिर शेख यांचे नेतृत्वाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या जुन्नर येथील कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याच्या माँ आंदोलन महिला प्रमुख ताहीरा शेख यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी हाजी प्रा.जावेद पाशा कुरेशी होते.   

ते म्हणाले, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे तसेच मुस्लिम समाजातील जनतेचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्या  या संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत

स्वराज्य अभियान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मानव कांबळे, माँ आंदोलनच्या निमंत्रक सिम्मी शेख, नगरसेविका समिना शेख, स्वराज्य अभियान पुणे जिल्हा अध्यक्ष इब्राहिम खान, कादरिया वेल्फेअर सोसायटीचे तालुका अध्यक्ष रौफखान, दानीश शब्बीर शेख, संभाजी साळवे, अलका फुलपगार, मझहर तिरंदाज, रिजवान पटेल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 
मानव कांबळे म्हणाले, मराठा समाज लाखोंच्या संख्येने आरक्षणासाठी एकत्र येत आहेत त्याप्रमाणे आपण देखील एकत्र आले पाहिजे.

प्रा. कुरेशी म्हणाले, संघटनेचे माध्यमातून तरुण पिढीच्या मेंदूला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. येत्या १९ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय येथे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे याबाबत निवेदन द्या, निदर्शने करा, धरणे आंदोलन करा असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Junnar Muslim Reservation Claims Council