

Brave Pet Dogs Repel Leopard Attack in Narayangaon
sakal
नारायणगाव : शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याचा हल्ला जिगरबाज तीन पाळीव कुत्र्यांनी परतवून लावला. ही घटना आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास गुंजाळवाडी येथे घडली. एकी हेच बळ असल्याचे अशोक विठ्ठल दरेकर यांच्या काळ्या, ढवळ्या व हल्क या तीन पाळीव कुत्र्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज चित्रीत झाले आहेत. नारायणगाव - गुंजाळवाडी रस्त्यालगत अशोक दरेकर यांचा बंगला आहे. मागील वर्षी त्यांच्या एका पाळीव कुत्र्याचा बिबट्याने फडशा पडला होता.