Otur Leopard Attacks Farm Laborer in Otur During Daylight
Sakal
ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथून जवळच असलेल्या डोमेवाडी मध्ये मंगळवारी ता.१८ रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान बिबट्याने शेतमजूरावर हल्ला करून त्याला किरकोळ जखमी केले.सुदैवाने तरुणांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे.जुन्नर तालुक्यात बिबट्या दिसने किंवा बिबट हल्ला ही नविन गोष्ट नाही परंतू बिबट्याचे दिवसा ढवळ्या हल्ले होऊ लागल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण असून शेतात काम करणाऱ्या शेत मजूरांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.