Leopard Rescue : केळीच्या बागेत बिबट मादी जेरबंद! जुन्नरमध्ये १० दिवसांत दुसरा बिबट्या अडकला; नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास
Leopardess Trapped in Junnar Field : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील घाडगेपट शिवारात शेतकरी उत्तम खर्गे यांच्या केळीच्या बागेत वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात, गेल्या १० दिवसांतील दुसरी बिबट मादी जेरबंद झाली आहे.
पिंपळवंडी : पिंपरी पेंढारच्या (ता. जुन्नर) घाडगेपट शिवारातील शेतकरी उत्तम खर्गे यांच्या केळीच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (ता. ९) पहाटे सहा वाजता तीन वर्ष वयाची बिबट मादी जेरबंद झाली आहे.