विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

जुन्नर- कल्याण-डोंबिवली येथील परिवार आधार सेवाभावी संस्था व भिवंडीच्या 'क्लिअर वॉटर रिसर्च अँड इंफ्रा' कंपनीने तेजुर ता.जुन्नर येथील ठाकरवाडीच्या शाळेत बसविलेल्या एक हजार क्षमतेच्या आर.ओ.वॉटर प्युरिफायर योजनेचा रामनवमीला शुभारंभ झाला. यामुळे आता विद्यार्थी व ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार असून, अशुद्ध पाण्यामुळे पोटाच्या विकारांपासून गावाची सुटका होणार आहे. 

सकाळचे बातमीदार दत्ता म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, गटनेते दिलीप गांजळे, शिक्षणाधिकारी के.डी. भुजबळ, प्रकल्पधिकारी रवींद्र तळपे, परिवार संस्थेचे गोविंद नलवडे, जावेद हैदर, प्रकल्प प्रमुख प्रशांत सातव, समीर चव्हाण, केतन जाधव, सना केदार, संपत सांगडे, सरपंच संजय गावडे, जालिंदर दुधवडे आदी मान्यवर शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेकडून संरक्षक भिंत व रस्त्याचे काम करणार असल्याचे लांडे यांनी जाहीर केले. योजना कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी पुढील खर्चाचे नियोजन करून त्यासाठी निधी जमा करा असे म्हसकर यांनी सांगितले. गोविंद नलवडे, गांजळे, तळपे, भुजबळ आदींची भाषणे झाली. यावेळी मुलांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच साहित्य ठेवण्यास कपाटे देण्यात आली. मुख्याध्यापक पांडुरंग भौरले, शिक्षक सदू मुंढे, शोभा ढमढेरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचलन तानाजी तळपे यांनी केले. सचिन नांगरे यांनी आभार मानले.

Web Title: junnar pune pure water students school