

Seized JCB goes missing from Junnar Revenue Bhavan
Sakal
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केल्याबाबत कारवाई करण्यात आलेला जेसीबी महसूल भवनातून चक्क गायब झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात इसमांनी चक्क महसूल भवनातूनच जेसीबी चोरल्याची घटना घडल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर नानाविध प्रश्न निर्माण झाले आहे. याबाबतची फिर्याद संतोष कांबळे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली.