sambhaji bhide guruji
sambhaji bhide gurujisakal

Sambhaji Bhide : जुन्नरला श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाशेजारी लिफ्ट बसविण्याची मागणी योग्यच

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाशेजारी हायड्रोलिक लिफ्ट बसविण्याची शिवभक्तांची मागणी योग्य असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
Summary

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाशेजारी हायड्रोलिक लिफ्ट बसविण्याची शिवभक्तांची मागणी योग्य असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

जुन्नर - किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाशेजारी हायड्रोलिक लिफ्ट बसविण्याची शिवभक्तांची मागणी योग्य असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी सूचना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना केली.

भीमाशंकर ते शिवनेरी मोहिमेच्या दृष्टीने नियोजन बैठकीसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आज ता. १६ रोजी जुन्नरला आले होते. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेतली. मुख्याधिकारी देवरे यांनी याबाबतच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती भिडे गुरुजींना दिली.

दरम्यान हायड्रोलिक लिफ्ट बसविण्यास विलंब होत असल्याने शिवभक्तांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते ओंकार जोशी यांनी २७ जानेवारी पासून साखळी पध्दतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ शिल्पाला हार घालण्यासाठी ओंकार जोशी हायड्रोलिक लिफ्ट ची मागणी फेब्रुवारी २०२० पासून करण्यात येत आहे. हायड्रोलिक लिफ्ट कायमस्वरुपी शिडी उभारण्यात येणार नसुन सदर लिफ्ट ही ही आवश्यकतेनुसार वापरण्यात येणार आहे. व इतर वेळेस हि लिफ्ट जमीन पातळीवर बंदीस्त रहाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांस पुष्पहार घालण्यासाठी क्रेनचा वापर केला जातो. क्रेनचा वापर करणे धोकादायक व जोखमीचे आहे असल्याने शिवभक्तांनी जुन्नर नगर परिषदेस लोकवर्गणीतून हायड्रोलिक लिफ्ट बसविणेसाठी अर्ज केले आहेत.

यासाठी आवश्यक परवानगीसाठी कागदपत्रे शिवभक्तानी उपलब्ध करुन दिली आहेत. पालिका प्रशासन लिफ्ट बसविणेबाबत आग्रही दिसून येत नसल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीसाठी ओंकार जोशी यांनी मार्च २२ मध्ये तीन दिवस उपोषणही केले होते.

राज्यात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास हार घालण्यासाठी हायड्रोलिक लिफ्टची सुविधा भोर, पंढरपुर, इचलकरंजी, पुणे व वळती (आंबेगांव) या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपरिषद) यांच्या एका जनरल बोर्डाच्या ठरावावर काम होवून कार्यरत आहेत. असे असताना शिवजन्मभूमीमध्ये हायड्रोलिक लिफ्ट का होऊ शकत नाही? असा सवाल करत जो पर्यन्त प्रशासन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत नाही तो पर्यन्त हे आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com