

Junnar Court Sentences Father to Life Imprisonment in Child Abuse Case
sakal
-पराग जगताप
ओतूर: ओतूर (ता.जुन्नर) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ डिसेंबर २०२० रोजी ९ वर्षाची मुलगी शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवण करण्यासाठी घरी आली असता घरात कोणी नसल्याची संधी साधुन तीच्या वडीलांनी घराचा दरवाजा आतून बंद केला व स्वतःच्याच अल्पवयीन मुलीस हाताने मारहाण करून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला आहे. सदरचा प्रकार मुलीच्या आईला समजल्यावर १९ डिसेंबर २०२० रोजी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवर ओतूर पोलीस स्टेशनला नराधम बापावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.