जुन्नरला सोयाबीनची पेरणी सरासरीच्या दुप्पट

दत्ता म्हसकर 
सोमवार, 23 जुलै 2018

जुन्नर - यावर्षीच्या खरीप हंगामात जुन्नर तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून सरासरीच्या दुप्पट क्षेत्रात सोयाबीन पेरणी झाली आहे.तालुक्यातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 2 हजार 700 हेक्टर असून आज ता.23 पर्यंत सरासरीच्या 175 टक्के  सुमारे 4 हजार 800 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली असल्याचे सहायक कृषी अधिकारी बापू रोकडे यांनी सांगितले.

भुईमूग व बाजरीचे क्षेत्र कमी होत चालले असून शेतकरी सोयाबीन पीककडे वळले असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाचे वतीने सोयाबीनचे 380 हेक्टर क्षेत्रात पीक प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. अंतिम टप्प्यात सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा जाणवला अन्यथा या क्षेत्रात आणखी वाढ झाली असती. तालुक्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

खरिपाच्या 75 टक्के पेरण्या झाल्या असून एकूण 58 हजार 800 हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 45 हजार हेकटर क्षेत्रात पेरणीची झाली आहे. भाताच्या 40 हेक्टर क्षेत्रात पीक प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. पश्चिम आदिवासी भागात भाताची 70 टक्के लागवड झाली असून भट लागवड अंतिम टप्प्यात आहे. भाताच्या 12 हजार 800 हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 8 हजार हेकटर क्षेत्रात लागवड झाली आहे.भुईमुगाची 40 टक्के पेरणी झाली असून 6 हजार 800 हेकटर क्षेत्रापैकी 2 हजार 700 हेकटर क्षेत्रात पेरणी झाली आहे. इतर कडधान्याच्या 65 टक्के पेरण्या झाल्या असून 2 हजार हेक्टर क्षेत्र 1300 हेकटर क्षेत्रात पेरणीची कामे 
महसूल विभागाच्या तालुक्यातील नऊ मंडल विभागात आज अखेर ता.23 रोजी 463 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 34 दिवसात सरासरी 65 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Junnar sown soybean double the average