esakal | एसटी बसमध्ये जागा पकडण्याची शक्कल महिलेच्या आली अंगलट
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

एसटी बसमध्ये जागा पकडण्याची शक्कल महिलेच्या आली अंगलट

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर - येथील नवीन एसटी बसस्थानकात एसटी बसमध्ये (ST Bus) जागा धरण्याची शक्कल जळवंडी ता. जुन्नर येथील महिलेला (Women) चांगलीच महागात पडली.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी ता. १० रोजी दुपारी ही घटना घडली. गणेश स्थापनेमुळे एसटी बस स्थानकावर विविध ठिकाणी जाणाऱ्यांची मोठी गर्दी होती. बस मध्ये बसून प्रवास करावा अशी प्रत्येक प्रवाशाची इच्छा असते. यातून बस मध्ये जागा मिळविण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात कोणी चालकाच्या दरवाजातून तर काही पाठीमागील खिडकीतून आत प्रवेश करत असतानाचे चित्र गर्दीच्या वेळी हमखास पहावयास मिळते. काही जण खिडकीतून सीटवर रुमाल,टोपी,बॅग,पिशवी टाकून जागेचा हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.

हेही वाचा: पुणे : मूर्ती विसर्जनासाठी चक्क ठेकेदाराची ११ दिवस सेवा

जुन्नर-देवळे एसटी बस मध्ये गर्दीमुळे असाच काही प्रकार सुरू होता. जळवंडी येथील राजश्री नागेश सोनवणे या महिलेने खिडकीतून आपली पिशवी सीटवर टाकून आपली जागा आरक्षित केली मात्र दरवाजातून आत जात सीटवर असणारी पिशवी त्यांनी हातात घेतली यावेळी त्यातील आपला दहा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा वाय ५१ मोबाईल फोन गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची फिर्याद दिली असून जुन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. जुन्नर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top