esakal | विसर्जनाचे दिवस ४; फिरत्या हौदांसाठी खर्च ११ दिवसांचा !
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : मूर्ती विसर्जनासाठी चक्क ठेकेदाराची ११ दिवस सेवा

विसर्जनाचे दिवस ४; फिरत्या हौदांसाठी खर्च ११ दिवसांचा !

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : कोरोनामुळे महापालिकेने फिरत्या विसर्जन हौदाद्वारे नागरिकांना सुविधा देण्याचे जाहीर केले. पण, घनकचरा विभागाने निविदा मागवून टाकलेल्या अटी-शर्तीमुळे ठेकेदाराचेच भले होत आहे. गणेशोत्सवात दीड दिवस, पाचवा, सातवा आणि अनंत चतुर्दशी हे चार दिवसच विसर्जनाचे असतात. पण, महापालिकेने थेट ११ दिवसांसाठी फिरते हौद घेतले असून, यासाठी एक कोटी २६ लाख १९ हजार ८६० रुपये ठेकेदाराला दिले जाणार आहेत. यामध्ये ८० लाख रुपये जास्त खर्च होणार आहे. चार दिवसांसाठी ही निविदा काढली असती तर ४६ लाख रुपयांत विसर्जन झाले असते, हे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे.

कोरोनामुळे गणेशोत्सवावर बंधने आल्याने विसर्जनासाठी नागरिकांना नदीच्या घाटावर जाण्यास बंदी घातली आहे. यास पर्याय म्हणून फिरते विसर्जन हौद आणि मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापौर निधीतून ९९ लाखांची तरतूद उपलब्ध करून दिली. त्यानुसार घनकचरा विभागाने महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ६७ (३) (क) या तरतुदीखाली निविदा मागविल्या.

त्यामध्ये एका कंपनीने ६० वाहनांसाठी ११ दिवसांसाठी प्रत्येकी दोन लाख १० हजार ३३१ रुपये हा सर्वात कमी दर दिला. यास घनकचरा विभागाने मान्यता दिली. यासाठी एक कोटी २६ लाख १९ हजार ६८० रुपये खर्च होणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी गडबडीत आणला होता, पण मंगळवारची बैठक तहकूब झाल्याने यावर निर्णय होऊ शकला नाही. याबाबत घनकचरा विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा: "CM नहीं PM बदलो! मुख्यमंत्री बदलण्याने मोदींचं अपयश झाकणार नाही"

एकही मूर्ती विसर्जित नाही

दीड दिवसाचे गणपती विसर्जन करताना शनिवारी दुपारचे तीन वाजून गेले तरी ६० पैकी निम्म्या गाड्या कात्रज तलाव येथे होत्या. त्यामुळे सर्व व्यवस्था कोलमडून गेली. ज्या दिवशी विसर्जन नसेल, त्या दिवशी या गाड्या थांबून राहणार आहेत. याबाबत आज (रविवारी) फिरत्या हौदांवरील काही चालकांशी बोलल्यानंतर, आज आम्ही एकाच ठिकाणी थांबून आहोत, पण एकही मूर्ती विसर्जनासाठी आलेली नाही असे सांगितले. दरम्यान, या गाड्यांना प्रतिदिन १२ तासासाठी प्रतितास १५९३ रुपये भाडे दिले जाणार आहे.

हेही वाचा: योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

असे आहे गणित

गणेशोत्सवाचे दिवस - ११

मूर्ति विसर्जनाचे दिवस - ४

विसर्जनासाठी गाड्या भाड्याने घेतलेले दिवस - ११

गाड्यांची संख्या - ६०

प्रतिदिन प्रतिगाडी भाडे - १९,१२१

११ दिवसांसाठी एका गाडीचे भाडे - २,१०,३३१

ठेकेदाराला देण्यात येणारी रक्कम - १,२६,१९, ६८०

विसर्जनाच्या चार दिवसांचे भाडे - ४५,८९,०४०

इतर सात दिवसांचे भाडे - ८०,३०,८२०

loading image
go to top