जुन्नरला छेडछाड प्रकार घडणार नसल्याची विद्यार्थ्यांनी दिली ग्वाही

दत्ता म्हसकर
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

जुन्नर - येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालय व परिसरात विद्यार्थिनीची छेड-छाड तसेच आक्षेपार्ह वर्तनाचे प्रकार घडणार नाहीत, अशी ग्वाही विद्यार्थ्यांनी पोलिस प्रशासनास दिली.

याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाकडून समुपदेशन करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून होणाऱ्या कडक कारवाईची माहितीची समज मिळाल्यानंतर असे प्रकार घडणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक यांना महिला सुरक्षा विषयी माहिती दिली. साध्या वेषातील पोलिस कर्मचारी परिसरात लक्ष ठेवणार असल्याचे सूचित केले. शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करताना आगामी गणेशोत्सवात विद्यार्थ्यांनी पोलिस मित्र बनून सहकार्य करावे असे आवाहन केले त्यास विद्यार्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा वापर केल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची चर्चा केल्यानंतर विद्यार्थांनी डॉल्बीचा वापर करणार नसल्याचे देखील जाहीर केले. 

अपर पोलिस अधिकारी संदीप जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे व जुन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेश बोडखे, मिलिंद साबळे, स्मिता नवघरे व कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक, प्राध्यापक, व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. येथील शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, अण्णासाहेब आवटे विद्यालय येथेही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

Web Title: junnar - students told not to do any Tampering